'Bikini Photoshoot साठी मी...', अभिनेत्री निया शर्माचा मोठा खुलासा

'Bikini Photoshoot साठी मी...', अभिनेत्री निया शर्माचा मोठा खुलासा

अभिनेत्री निया शर्माने (Nia Sharma) बिकिनी लूकमधील (Bikini Look) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 02  मार्च : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेमध्ये असते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी निया शर्मा नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. निया शर्माच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. या दिवसात निया शर्मा 'जमाई राजा 2.0' वेबसीरिजमुळे (Jamai Raja 2.0) चर्चेत आहे. निया शर्मा यामधील काही सीन्समध्ये बिकिनीमध्ये दिसून आली आहे. निया शर्मानं बिकिनी लूकमधील (Bikini Look)  काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शूटबाबत बोलताना निया शर्माने अनेक खुलासे केले आहेत.

निया शर्मानं मुलाखती दरम्यान सांगितलं की, 'हा सीन शूट करण्याच्या दोन दिवस आधीपासूनच मी जेवण बंद केलं होतं. बिकिनी सीन हा या शोचा महत्वाचा भाग आहे. मी जेव्हा बीचवर गेली तेव्हा डायरेक्टरने सांगितलं की या सीनची शूटिंग त्याच दिवशी होणार आहे. मी खूपच नाराज झाले होते. त्यानंतर मी बिकिनीमध्ये काही फोटो क्लिक करत ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आणि ते व्हायरल झाले.'

निया शर्माने पुढे सांगितले की, 'माझं पोट त्या फोटोमध्ये फुगलेलं दिसत होतं. माझ्या इतर बिकिनी फोटोमध्ये पोट फ्लॅट दिसतं. हे अत्यंत कठीण होतं कारण मला माहित होतं की मी जनतेला फसवत आहे.' निया शर्मानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोवरून निया शर्माला सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा करण्यात आलं.

हे वाचा -  Saina Release Date: भारताची अव्वल बॅडमिंटनपटू लवकरच दिसणार चित्रपटगृहात

नुकताच पार पडलेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड्समध्ये निया शर्मा सहभागी झाली होती. या दरम्यान तिनं अभिनेता रवी दुबेला बेस्ट किसर म्हटलं होतं. निया शर्मानं 'जमाई राजा 2.0' या शोसाठी अंडरवॉटर किसिंग सिन्स दिले आहेत. अभिनेत्री निया शर्मा टिव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. नियानं 'एक हजारों में मेरी बहना है', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'जमाई राजा', 'पवित्र रिश्ता', 'कुबूल है', 'आप के आ जाने से', 'नागिन 3' आणि 'नागिन 5' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Published by: Aditya Thube
First published: March 2, 2021, 10:56 PM IST

ताज्या बातम्या