• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Happy Birthday: निया शर्मा नव्हे तर असं आहे या बोल्ड क्वीनचं खरं नाव

Happy Birthday: निया शर्मा नव्हे तर असं आहे या बोल्ड क्वीनचं खरं नाव

निया शर्मा टीव्हीवरील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेसच्या चर्चा सतत सोशल मीडियावर सुरु असतात.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील निया शर्मा (Nia Sharma) हे ना आज कोण नाही ओळखत. या नावाला एक खास ओळख मिळाली आहे. निया शर्मा टीव्हीवरील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेसच्या चर्चा सतत सोशल मीडियावर सुरु असतात. निया शर्मा आज आपला 31 वा वाढदिवस(Birthday Today) साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.
  View this post on Instagram

  A post shared by Nia Sharma (@niasharma90)

  अभिनेत्री निया शर्माचा जन्म दिल्ली येथे झाला होता. दिल्लीमधूनच तिने मास कम्युनिकेशनची डिग्री मिळवली आहे. नियाच खरं नाव नेहा शर्मा असं आहे. मात्र आज ती निया याच नावाने ओळखली जाते. नियाने २०१० मध्ये 'काली' या मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनतर नियाने 'बहने' या मालिकेत निशा मेहता ही भूमिका साकारली होती. मात्र नियाला खरी ओळख स्टार प्लसवरील 'एक हजारोंमी मेरी बहना है' या मालिकेने मिळवून दिली. या मालिकेतून ती 'मानवी' या नावाने प्रसिद्ध झाली होती. ही भूमिका प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात पसंत पडली होती. नियाने २०११ ते २०१३ पर्यंत ही मालिका केली होती. (हे वाचा:Video : Marathi Bigg Boss सीजन 3 मध्ये तुफान आणणाऱ्या सदस्यांचा First Look) त्यांनतर २०१४ मध्ये नियाने अक्षय कुमारची मालिका 'जमाई राजा' मध्ये काम केलं होत. अक्षय या मालिकेचा निर्माता होता. हि मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून निया शर्मा आणि रवी दुबे हि जोडी आपल्या भेटीला अली होती. नियाने २०१४ ते २०१६ पर्यंत या मालिकेत काम केलं होत. त्यांनतर नियाने हि मालिका सोडली होती. त्यांनतर २०१७ मध्ये नियाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला होता. नियाने विक्रम भट्ट यांच्या 'ट्विस्टेड' या वेबसिरीजमधून हा डेब्यू केला होता. या सिरीजचर ३ भाग आले होते. (हे वाचा:न्यूयॉर्कमध्ये सुरूय सुहाना खानचा प्रोजेक्ट्? नवा LOOK होतोय VIRAL) तसेच नियाने २०१७ मध्ये कलर्स चॅनेलवरील 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ती तब्बल २ वेळा बाहेर झाली होती. मात्र पुन्हा तिसऱ्यांदा तिने या शोमध्ये एन्ट्री केली होती. आणि त्यानंतर ती फायनलिस्टसुद्धा झाली होती. त्यांनतर ती 'मेरी दुर्गा' मालिकेत झळकली होती. २०१९ मध्ये निया 'नागीन ४' मध्ये झळकली होती. त्यानंतर ती 'खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया' मध्ये सहभागी झाली होती आणि त्याची विजेतीसुद्धा ठरली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: