VIDEO : निया शर्माचा आगीशी खेळ, पाहा काय झाली अवस्था

VIDEO : निया शर्माचा आगीशी खेळ, पाहा काय झाली अवस्था

आशियातील सर्वात मादक स्त्रीयांमध्ये गणली जाणाऱ्या निया शर्माला असा आगीशी खेळ करणं चांगलंच महागात पडलं.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा आशियातील सर्वात मादक स्त्रीयांमध्ये गणली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा तिचे फोटो अणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच नियानं नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निया फायर पान खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ काहीसा गंमतीशर आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

निया शर्मानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ इंदौरचा आहे. या व्हिडिओमध्ये निया इंदौरमधील प्रसिद्ध फायर पानचा आनंद घेताना दिसत आहे. पण त्याच वेळी पान खाताना तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स मात्र पाहण्या लायक आहेत. फायर पान खाताना ती सुरुवातीला घाबरून मागे होते. पण नंतर ते पान तोंडात घातल्यावर तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पूर्णपणे बदलतात. हा व्हिडिओ शेअर करताना नियानं, पानासोबत ट्विस्ट हे फायर पान आहे. असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओवर नियाच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. खतरों के खिलाडी सारख्या शोमध्ये अवघड टास्क पूर्ण करणारी हीच ती निया जी फायर पानला घाबरते असा प्रश्न पडतो.

Bigg Boss Marathi 2- या रविवारी शिवानी सुर्वे करणार कमबॅक?

 

View this post on Instagram

 

Twist with the PAAN!! It’s 🔥 Paan!! #indore

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

नियाच्या कामाद्दल बोलायचं तर तिनं स्टार प्लसच्या ‘काली : एक अग्नी परिक्षा’ या मालिकेतून तिन टीव्ही जगतात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तीन स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘एक हजारों मे मेरी बहना है’मध्येही दिसली होती. याशिवाय झी टीव्हीवरील ‘जमाई राजा’ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली. तसेच ती ‘खतरों के खिलाडी सीझन 9’ची कंटेस्टंट होती.

डीजीपीचा दावा श्रीदेवींची झाली हत्या, पती बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

सध्या निया ‘इश्क मे मरजावाँ’ मध्ये आरोहीची भूमिका साकारत आहे. तिला आशियातील दुसरी मादक स्त्रीचा किताब मिळाला आहे. तसेच टीव्ही जगतातील मोस्ट स्टायलिश पर्सनॅलिटी म्हणून तिला सन्मानित करण्यात आलं आहे.

राधिका आपटे आणि देव पटेलचा लव्ह सीन झाला लीक

=================================================================

SPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी?

First published: July 13, 2019, 10:49 AM IST

ताज्या बातम्या