' न्यूटन' आॅस्कर शर्यतीतून बाहेर

' न्यूटन' आॅस्कर शर्यतीतून बाहेर

अमित मसुरकर दिग्दर्शित ' न्यूटन' सिनेमा आॅस्कर शर्यतीतून बाहेर पडलाय. परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं.

  • Share this:

15 डिसेंबर : अमित मसुरकर दिग्दर्शित ' न्यूटन' सिनेमा आॅस्कर शर्यतीतून बाहेर पडलाय. परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. राजकुमार रावची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी अाहे.  यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.

आॅस्करतर्फे ज्या चित्रपटांची नामांकनं झाली आहेत, त्यात 'अ फॅनटॅस्टिक वुमन', 'इन द फेड', 'ऑन बॉडी अँड सोल', 'फॉक्सट्राट', 'द इनसल्ट' , 'लवलेस', 'द वुंड', 'फेलिसिटे', 'द स्क्वायर' यांचा समावेश आहे.

23 जानेवारीला आॅस्कर पुरस्कार दिले जातील. आतापर्यंत मदर इंडिया (1958) , सलाम बाॅम्बे (1989) आणि लगान (2001) हे सिनेमे आॅस्कर नामांकनांमध्ये पहिल्या पाचात पोचले होते. पण आॅस्कपासून वंचित राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...