'न्यूटन'ची आॅस्करसाठी भारताकडून अधिकृत एंट्री

राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला न्यूटन बर्लीन महोत्सवात यांचा प्रीमिअर झाला होता आणि भारतात हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमित मसूरकरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2017 05:13 PM IST

'न्यूटन'ची आॅस्करसाठी भारताकडून अधिकृत एंट्री

22 सप्टेंबर : न्यूटन हा सिनेमा आजच प्रदर्शित झालाय आणि समीक्षकांची कौतुकाची थाप मिळत असतानाच आणखी एक चांगली बातमी समोर आलेय.यंदा जगातील सिनेमासाठी सर्वात लोकप्रिय अशा ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एण्ट्री म्हणून न्यूटनची घोषणा झालीय.

राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला न्यूटन बर्लीन महोत्सवात यांचा प्रीमिअर झाला होता आणि भारतात हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमित मसूरकरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

माओवादग्रस्त भागात मतदान पार पाडण्याचं आव्हान या विषयावर हा चित्रपट आहे. त्यातल्या राजकुमार रावच्या अभिनयाचं कौतुक होतंय. शिवाय एका मराठी दिग्दर्शकाचा सिनेमा आॅस्करसाठी निवडला जातोय, ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...