प्रिया दत्तनं दिलं संघाला प्रत्युत्तर, म्हणाल्या, माझा भाऊ आहे रोल माॅडेल!

संघाचं मुखपत्र पांचजन्यमध्ये संजू सिनेमावरून संजय दत्तवर टीका केली. त्या टीकेला उत्तर देत संजय दत्तच्या बहिणीनं संजय दत्तला रोल माॅडेल म्हटलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2018 05:41 PM IST

प्रिया दत्तनं दिलं संघाला प्रत्युत्तर, म्हणाल्या, माझा भाऊ आहे रोल माॅडेल!

मुंबई, 13 जुलै : संघाचं मुखपत्र पांचजन्यमध्ये संजू सिनेमावरून संजय दत्तवर टीका केली. त्या टीकेला उत्तर देत संजय दत्तच्या बहिणीनं संजय दत्तला रोल माॅडेल म्हटलंय. पांचजन्यमध्ये संजू आणि राजकुमार हिरानी यांच्यावर प्रचंड टीका केली होती.त्याच असं म्हटलं होतं की संजय दत्त आणि गुन्हेगारी जगाचं हिरानी यांनी उदात्तीकरण केलंय. त्याला उत्तर देताना प्रिया दत्तनं म्हटलंय, ' प्रत्येकाचे काही विचार असतात. संघ नेहमीच सकारात्मकतेच्या विरोधात असतो. संजय दत्त एक रोल माॅडेल आहे. मला कळत नाही यात वाद कसला आहे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या मुखपत्रात 'संजू' सिनेमावर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. सिनेमात हिरानी यांचे उद्दीष्ट संजय दत्तची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा होता का? असा प्रश्न मुखपत्रात विचारण्यात आला आहे. या सिनेमातून गुन्हेगाराचे समर्थन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला स्टार कसे करू शकता असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला. एकीकडे संजय दत्तची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे तर दुसरीकडे मात्र अनेकांना हा सिनेमा आवडतही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...