सोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...

सोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...

सोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. सोशल मीडियावर ती तिचे सगळे अपडेट्स देत असते.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : बरेच दिवस झाले होते अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं कुठलीही पोस्ट शेअर केली नव्हती. आता बऱ्याच दिवसांनी तिनं इन्स्ट्राग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यातही तिची सकारात्मक भावना समोर येतेय.


सोनालीनं हातात एक पुस्तक घेऊन फोटो शेअर केलाय. त्यात तिनं म्हटलंय, ' आता दुसऱ्या पुस्तकाची अनाऊन्समेंट करायची वेळ येऊन ठेपलीय. अगोदर उशीर झालाय. केमोथेरपीमुळे माझं वजन कमी झालं, तसं डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं होतं. पण आता सर्व ठीक आहे.'
सोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. सोशल मीडियावर ती तिचे सगळे अपडेट्स देत असते. उपचार घेताना कितीही त्रास झाला तरीही ती आपलं आयुष्य नाॅर्मल जगतेय. ती आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतेय. काही दिवसांपूर्वी तिनं एक फोटो शेअर केलाय.

इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोत ती एका गोड कुत्र्यासोबत आहे. त्यात तिनं लिहिलं होतं, कुत्रा सर्वोत्तम असतो. मी माझं मुंबईचं घर सोडून आले. खूप आठवणी येतात. पण या गोड कुत्र्याबरोबर खेळताना छान वाटतं.


सोनालीला भेटायला अनेक बाॅलिवूड कलाकार न्यूयाॅर्कला पोचलेत. त्यात अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, ऋषी कपूर, नितू कपूर आहेत.काही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.


शनायाच्या दिवाळी फराळाबद्दल ऐकलंत तर आश्चर्य वाटेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2018 02:44 PM IST

ताज्या बातम्या