...म्हणून वर्षाअखेरीस 'लकी' ठरणार सिद्धार्थ जाधव!

...म्हणून वर्षाअखेरीस 'लकी' ठरणार सिद्धार्थ जाधव!

अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या खूप बिझी आहे. या वर्षाची सुरुवात सिद्धूची येरे येरे पैसा सिनेमानं झाली होती. आणि आता वर्ष संपणार ते दोन मोठ्या सिनेमानं.

  • Share this:

मुंबई, 29 आॅगस्ट : अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या खूप बिझी आहे. या वर्षाची सुरुवात सिद्धूची येरे येरे पैसा सिनेमानं झाली होती. आणि आता वर्ष संपणार ते दोन मोठ्या सिनेमानं. येरे येरे पैसा रोमँटिक काॅमेडी होता. सिद्धार्थ जाधवनं त्या सिनेमात खूप धमाल केली होती. आता तो आणखी धमाल करायला येतोय, पण बाॅलिवूड सिनेमातून.

हो, सिद्धार्थ जाधव रणवीर सिंगसोबत 'सिंबा' सिनेमात काम करतोय. ' या सिनेमात मी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय. पण रोहित सरांनी अजून काही बोलायला परवानगी दिलेली नाही. ' सिद्धार्थ जाधवला आम्ही या सिनेमाबद्दल विचारलं असता, त्यानं उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी त्यानं रणवीर आणि त्याचा फोटो ट्विटही केलाय.

सिंबामध्ये मराठी कलाकारांची फौजच आहे. सिद्धार्थसोबत सौरभ गोखले, विजय पाटकर, नंदू माधव यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय.

याशिवाय सिद्धार्थ जाधव रितेश देशमुखच्या माऊली सिनेमात बिझी आहे. त्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. आषाढी एकादशीचं निमित्त साधून रितेशनं माऊलीचं पहिलं पोस्टर रिलीज केलं होतं. माऊली सिनेमात रितेश आणि सयामी खेर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. सयामीचा हा पहिलाच मराठी सिनेमा. त्यामुळे खूप उत्सुकता वाढलीय.  रितेशची निर्मिती असलेला बालक पालक आणि लय भारी भरपूर चालला होता. माऊली हा सिनेमा लय भारी सिनेमाचा सिक्वल आहे. लय भारी सिनेमात रितेशचं नाव माऊली होतं. त्यात तो माऊली आपल्या आईला न्याय मिळवून देतो. तिच्यासाठी प्राणाची बाजी लावतो, अशी गोष्ट होती.

सिद्धार्थ जाधवनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात तो संजय जाधवच्या लकी सिनेमाबद्दल सांगतोय. पण खरं तर तो स्वत: लकीमध्ये काम करत नाहीय. पण त्याचा प्रमोशनल व्हिडिओ मस्त झालाय.

First published: August 29, 2018, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading