करिना,करिष्मा आणि शाहरूख खान दिसणार एका पडद्यावर

करिना,करिष्मा आणि शाहरूख खान दिसणार एका पडद्यावर

शाहरूख खान सध्या सातव्या आसमानात आहे. आणि नसायला काय झालं? तो करिना कपूर, करिष्मा कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या सोबत स्क्रीन शेअर करतोय.

  • Share this:

मुंबई, 31 आॅगस्ट : शाहरूख खान सध्या सातव्या आसमानात आहे. आणि नसायला काय झालं? तो करिना कपूर, करिष्मा कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या सोबत स्क्रीन शेअर करतोय. फॅन्ससाठी तर ही स्पेशल ट्रीट ठरणार आहे. हे सगळे सुपरस्टार्स एकत्र एका स्क्रीनवर दिसणार आहेत. यात सासू आणि सूनही आहे. किंग खाननं तसं ट्विट केलंय.

आपल्या ट्विटमध्ये त्यानं म्हटलंय, 'या स्त्रियांसोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव अविस्मरणीय. लक्ससोबत टबमध्ये राहण्याचा हा फायदा.' म्हणजे हे चारही जण लक्सच्या जाहिरातीत दिसणार आहेत. करिना, करिष्मा आणि शर्मिला टागोर यांनी गोल्डन रंगाचा पोशाख परिधान केला होता. सासुबाई शर्मिला टागोर सूनबाई करिनाला चांगली स्पर्धा देत होत्या. शाहरूख खान त्यात काळ्या सूटमध्ये देखणा दिसत होता.

किंग खाननं आतापर्यंत लक्सची जाहिरात कतरिना, माधुरी दीक्षित, दीपिकासोबत शूट केलीय.

शाहरूख खान सध्या झीरो सिनेमात बिझी आहे. कतरिना आणि अनुष्कासोबतच्या या सिनेमाचं शूटिंग संपलंय आणि आता पोस्ट प्राॅडक्शनचं काम सुरू आहे. इकाॅनाॅमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपण हाॅलिवूडला का जात नाही हे सांगितलं. तो म्हणाला मी अॅप्रोच होणार नाही. त्यांना हवं तर मला विचारावं.

शाहरूख खान म्हणाला, बाॅलिवूडमध्ये ओम पुरींनी हाॅलिवूड कल्चर सुरू केलं. प्रियांका चोप्रा तर हाॅलिवूडमध्येच आहे. इरफाननंही हाॅलिवूडपट केलेत. अमितजींनी केलेत. शाहरूख म्हणाला, माझं इंग्लिश चांगलं नाही. मला वाटतं मी हाॅलिवूडसाठी फिट नाही. मी फक्त बाॅलिवूडचाच विचार करतोय. माझी इच्छा आहे की टाॅम क्रूझनं म्हणायला हवं त्याला हिंदी सिनेमात काम करायचंय. तो दिवस सर्वात चांगला असेल.

VIDEO : सुप्रिया सुळेंची 'सेल्फी विथ खड्डे' ही मोहीम पुन्हा सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 02:53 PM IST

ताज्या बातम्या