महागुरूंचं 'मुंबई अँथम' वादाच्या भोवऱ्यात

महागुरूंचं 'मुंबई अँथम' वादाच्या भोवऱ्यात

महागुरू सचिन पिळगांवकर हे सध्या त्यांच्या एका गाण्यामुळे चर्चेत आलेत. हे गाणं 'आमची मुंबई-मुंबई अँथम' या नावाने सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलंय.

  • Share this:

मुंबई, 29 आॅगस्ट : महागुरू सचिन पिळगांवकर हे सध्या त्यांच्या एका गाण्यामुळे चर्चेत आलेत. हे गाणं  'आमची मुंबई-मुंबई अँथम' या नावाने सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलंय. जे गाणं रिलीज पाहिल्यानंतर अनेकांच्या जीवाचा नुसता तिळपापड झाला. मुंबई शहराला ट्रिब्युट देण्यासाठी रिलीज केलेलं हे गाणं पाहून अनेकांनी त्यांना असं गाणं पुन्हा कधीही करू नका अशी विनंती केलीय. तर दुसरीकडे हे गाणं प्रचंड ट्रोल व्हायला लागलं. काहींनी तर 'सचिनजींना आवरा' असा हॅशटॅगच सुरू केला. तर काहींनी सचिनजी पैशांची कमतरता वाटत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही निधी गोळा करू पण पुन्हा असा आत्याचार करू नका असंही त्यांना खडसावलं. एकंदर या गाण्याबाबत सुरू असलेली चर्चा पाहून स्वतः सचिनजींनी पुढाकार घेऊन याबाबत आपली भूमिका मांडलीय. सचिन यांच्या या प्रतिक्रियेवर अवधूत गुप्ते, विजु माने, संतोष जुवेकर यांनीही त्यांना पाठिंबा दिलाय.

काय म्हणाले सचिन पिळगांवकर?

नमस्कार मित्रांनो!

नुकताच सोशल मीडियावर रिलीज झालेला माझा एक व्हिडिओ बऱ्याच चर्चेचा विषय झाला. काहींना हसू आलं काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्या विषयीच्या प्रेमापोटी असं रडू आलं, त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो. एवढंच सांगेन की तुम्हाला जसं वाईट वाटलं, तसं मलाही वाटलं. परंतु, विश्वास ठेवा, मी हा व्हिडियो एकाही रुपयाच्या लालसेमुळे किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रलोभनामुळे केला नव्हता.

काही वर्षांपूर्वी एका अशाच माझ्या काॅस्च्युम डिझायनर मित्राला मदत करण्याच्या उद्देश्याने हे गाणं माझ्यावर शूट केलं गेलं. सेटवर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड कळली. परंतु, स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसऱ्याच्या कामात दखल देणे हे आजवर कधीच जमले नाही. स्वत: निर्माताही असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणार्या नुकसानाबद्दलही माहिती होती, म्हणून तेही करवलं नाही. काही प्रसंग मी करणार नाही असंही सांगितलं, जे दुसऱ्यावर करण्यात आले.

पुढे जेव्हा जेव्हा तो मित्र भेटला आणि व्हिडियो रिलिज होऊ शकत नसल्याबद्दल नाराज दिसला, तेव्हा मनाच्या कोपऱ्यात होत असलेल्या आनंदामुळे खूप अपराधिपणाची भावनाही वाटली. पण, ती आता संपलीये!! कारण, हा व्हिडियो शेवटी रिलीज झालाय. होनी को कौन टाल सकता है?!!

हेही वाचा

VIDEO : जेव्हा काजोल,माधुरीसमोर आशाताई गातात!

हिंदी मालिकांमध्ये चिन्मय मांडलेकरची 'दस्तक'

प्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 04:43 PM IST

ताज्या बातम्या