#News18RisingIndia : सोशल मीडियाच्या वापराचं 'माॅडेल' असू शकत नाही - प्रसून जोशी

ते म्हणाले, ' प्रत्येकाच्या आयुष्यातच चढउतार येत राहतात. सोशल मीडियावर सर्वसामान्य आणि खास व्यक्ती आपली मतं मांडू शकतात.'

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2018 02:03 PM IST

#News18RisingIndia : सोशल मीडियाच्या वापराचं 'माॅडेल' असू शकत नाही - प्रसून जोशी

20 मार्च : न्यूज18रायझिंग इंडियाच्या व्यासपीठावर सेन्साॅर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींना सोशल मीडियाच्या महत्त्वाबद्दल प्रश्न विचारले गेले. ते म्हणाले, ' प्रत्येकाच्या आयुष्यातच चढउतार येत राहतात. सोशल मीडियावर सर्वसामान्य आणि खास व्यक्ती आपली मतं मांडू शकतात. हे असं एक व्यासपीठ आहे, ज्यावर तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठेवू शकता.'

ते म्हणाले, ' सोशल मीडियामुळे समाजातले प्रत्येक आवाज येऊ लागलेत. त्यात काही प्रामाणिक आहेत, तर काही खोटे आहेत. त्यात द्वेष भरलाय. पण सोशल मीडिया खोट्या बातम्यांनाही उघडं पाडतं. '

फ्रींज एलिमेंटवर बोलताना ते म्हणाले, कुठला आवाज फ्रींज आहे आणि कुठला नाही हे कळणार कसं?

स्मृती इराणी म्हणाल्या, सोशल मीडियानं एकाधिकारशाही संपून टाकलीय. काही लोकांना वाटायचं बोलण्याचा अधिकार त्यांचाच. पण आता सोशल मीडियावर प्रश्न विचारले जातात. ते अशा लोकांना अडचणीचे होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...