News18 Lokmat

विराट-अनुष्का विवाहबंधनात, 'विरानुष्का'ने केले फोटो शेअर

दोघांनी मीडियालाही चकवा दिला. लग्न 12 डिसेंबरला होणार होतं, पण ते एक दिवस आधी झालं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2017 09:49 PM IST

विराट-अनुष्का विवाहबंधनात, 'विरानुष्का'ने केले फोटो शेअर

11 डिसेंबर : अवघी बाॅलिवूडनगरी आणि क्रिकेटजगत ज्या बातमीकडे नजरा लावून होतं अखेर ती 'बातमी' आली. बाॅलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अखेर विवाहबंधनात अडकले आहे. इटलीत हा शानदार विवाहसोहळा पार पडला. विराटने टि्वट करून लग्नाची बातमी जाहीर केलीये. आता मुंबईत 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन आहे.

बाॅलिवूडची 'रब ने बना दी जोडी' गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय टीमचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली प्रेमसंबंधानंतर अखेर आज 'एक दुजे की' शपथ घेत विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये मोजक्याच आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला. पारंपारिक हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला.

या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडून खास गुप्तता राखण्यात आली. उपस्थितांकडून एक फाॅर्म साईन करून घेतला होता. अगदी कॅटरिंगवाल्यांकडूनही हा फाॅर्म भरून घेण्यात आला होता. त्यांनाही तंबी दिली गेली की कुणी काही बाहेर बोललं तर काँट्रॅक्ट रद्द करण्यात येईल. 12 तारीख की 15 तारीख अशा लग्नाच्या तारखा समोर आल्या होत्या. पण दोघांनी मीडियालाही चकवा दिला. लग्न 12 डिसेंबरला होणार होतं, पण ते एक दिवस आधी झालं.

इटलीतली प्रसिद्ध बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये दोघांचं लग्न झालं. हे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडतं हाॅटेल आहे. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे.

विराट आणि अनुष्काने लग्नाचे फोटो टि्वटरवर एकाच वेळी शेअर केले आणि आम्ही एकमेकांना प्रेमाचं वचन देऊन विवाहबंधऩात अडकलोय. हा आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे.  कुटुंबिय, हितचिंतक आणि चाहते यांच्या प्रेमामुळे हा दिवस खास झालाय. आमच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभारे असं टि्वट विराट आणि अनुष्कानं केलं.

Loading...

विरानुष्काच्या लग्नाच्या बातमीने दोघांच्याही फॅन्समध्ये एक आनंदाची लहर उमटलीय. आता सगळे वाट बघतायत वधू-वर परत भारतात येण्याची. कारण मुंबईत 21 डिसेंबरला या जोडीचं ग्रँड असं रेसिप्शन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...