गानसरस्वती किशोरीताई काळाच्या पडद्याआड, IBN लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. IBN लोकमतनं त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली...

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 02:57 PM IST

गानसरस्वती किशोरीताई काळाच्या पडद्याआड, IBN लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली

राजेंद्र हुंजे, मुंबई

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. IBN लोकमतनं त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली...

किशोरीताई...आज तुम्ही आम्हाला पोरकं करून गेला आहेत. श्रीरंगाच्या सोबतीनं तुम्ही तुमच्या सुरावटीतून आम्हाला इतके रंग शोधायला लावलेत ना. आज त्याच्या सगळ्या छटा धुसर दिसत आहेत. जगण्यातलं सगळं मी तू पण अक्षरशः गळून पडलं आहे.

ताई खरं सांगू... 1998 साली जेव्हा अभिषेकी बुवा गेले ना...त्यावेळी मारवा पोरका झाला होता...आज तुम्ही गेलात आणि भूप पोरका झालाय हो...खरंतर तुम्ही हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीतातील दैवत होता आणि राहालदेखील...

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दल बोलताना एका कार्यक्रमात तुम्ही म्हणाला होता की... विदेशात जाऊन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकवण्यापेक्षा भारतातच त्याची महती अधिक वाढवली पाहिजे, या मातीनं आम्हाला मोठं केलं.

Loading...

किशोरीताईंच्या आई म्हणजे मोगुबाई कुर्डीकर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला एक कसदार आवाज... अल्लादियाँ खाँ साहेबांकडे त्यांच्या आईंनी शिक्षण घेतलं. पुढे आपल्या आईच्या गायनाकडे किशोरीताई ओढल्या गेल्या...त्यानंतर त्यांच्या तालमीत तयार झालेली ही गानसरस्वती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला मिळाली.

किशोरीताई...वयाच्या 84 व्या वर्षांपर्यंत तेही अगदी रोजच्या रियाजापासून ते मैफलींपर्यंत संगीताच्या तुम्ही केलेल्या साधनेमुळेच...या रागदारीतला भूप अधिक प्रगल्भ झाला....अभिजात बनला...तुम्ही नेहमी म्हणायचा की, सूरांशिवाय संगीत नाही, तबल्याशिवाय सूर निघणार नाहीत...हे सुरांचं वास्तव त्याची साधना करताना तुम्ही रसिकांना आणि शास्त्रीय संगीताच्या साधकांना पटवून दिलंत...ज्ञानेश्वरांच्या ओव्यांना तुम्ही दिलेल्या स्वरसाजला आळवत ती संगीत साधनाही आज तुमच्याकडे पाहात म्हणत असेल.

किशोरीताई...संगीताची तुम्ही इतकी सेवा केलीय की...ते सूर देखील आज तुम्हाला त्यांच्यापासून दूर जाताना आक्रंदत असतील...धाय मोकलून अश्रूंना वाट करून देत असतील...आणि तुम्ही मात्र त्यांची समजूत काढत असताना म्हणत असाल....सहेला रे...

किशोरीताईंना आयबीएन लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 08:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...