राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीची मोहोर, 'कासव'ला सुवर्णकमळ

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीची मोहोर, 'कासव'ला सुवर्णकमळ

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या 'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या 'सुवर्णकमळ'चा मान मिळाला आहे.

  • Share this:

07  एप्रिल :  अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवारी) दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला.

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या 'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या 'सुवर्णकमळ'चा मान मिळाला आहे. तर राजेश मापुस्करांच्या 'व्हेंटिलेटर'नं दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार व्हेंटिलेटरला मिळाला आहे.

'दशक्रिया' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला असून याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मनोज जोशी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'नीरजा'नं पटकावलाय.

रुस्तममधील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला अक्षय कुमार सर्वोत्तम अभिनेता ठरला. तर ‘दंगल’च्या झायरा वसिम हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

याशिवीय, नीरजा सिनेमातील अप्रतिम अभिनयासाठी सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर

सर्वोत्कृष्ट सिनेमा (सुवर्णकमळ)- कासव

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजेश मापुस्कर, व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट  संकलन- व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाः दशक्रिया​​

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- मनोज जोशी, दशक्रिया

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

लक्षणीय चित्रपट- नीरजा

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- नीरजा

स्पेशल उल्लेखनीय पुरस्कार- सोनम कपूर, नीरजा

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अक्षय कुमार, रुस्तम

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- झायरा वसीम, दंगल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मनोज जोशी- दशक्रिया

स्पेशल इफेक्ट- शिवाय

उत्तर प्रदेशला ‘फिल्म फ्रेंडली’ राज्याचा पुरस्कार

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 01:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading