आता सगळे खान गप्प का? कुलभूषण जाधव प्रकरणावर अभिजीतची प्रतिक्रिया

आता सगळे खान गप्प का? कुलभूषण जाधव प्रकरणावर अभिजीतची प्रतिक्रिया

  • Share this:

10 एप्रिल :  हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना  गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्वीटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त आहे. 'आता सगळे खान गप्प का आहेत?' असा सवाल करत त्याने  बॉलीवूडकरांवर निशाणा साधला आहे.

एवढचं नाही तर, भारतात पाकिस्तानी नागरिक दिसल्यास त्यांना झाडाला लटकवा, असंही त्यानं आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या टि्वटच्या माध्यमातून अभिजीतनं पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात काम देणाऱ्या सिनेदिग्दर्शकांवरही निशाणा साधला आहे. पाकिस्तानी तुम्हाला प्रामुख्यानं बॉलिवूडमध्ये किंवा महेश भट्ट आणि करण जोहर यांच्या घरात सापडतील, असा आरोपही त्यांनी आपल्या टि्वटमध्ये केला आहे.

First published: April 11, 2017, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading