रितेश देशमुखच्या मुलानं पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, VIDEO व्हायरल

रितेश देशमुखच्या मुलानं पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, VIDEO व्हायरल

रितेशला दाक्षिणात्य सुपरस्टार किचा सुदीपनं फिटनेस चॅलेंज दिलं होतं. रितेशनं ते पूर्ण केलंही. मग पाळी होती ती रितेशची नाॅमिनेट करायची. त्यानं आपल्या मुलालाच नाॅमिनेट केलंय.

  • Share this:

मुंबई, 30 आॅगस्ट : बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुखचे फिटनेस व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असणार. आता त्याला एक जबरदस्त काॅम्पिटेशन द्यायला कोणी तरी आलंय. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचाच मुलगा राहील आहे. रितेशला दाक्षिणात्य सुपरस्टार किचा सुदीपनं फिटनेस चॅलेंज दिलं होतं. रितेशनं ते पूर्ण केलंही. मग पाळी होती ती रितेशची नाॅमिनेट करायची. त्यानं आपल्या मुलालाच नाॅमिनेट केलंय.

मग काय? राहीलनं हे चॅलेंज स्वीकारलं. राहीलची आई जेनेलियानं राहिलचा हा व्हिडिओ ट्विट केलाय. यात राहीलची एनर्जी, उत्साह खूपच दिसून येतो.राहीलनं हे चॅलेंज चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

या व्हिडिओत राहीलनं अनेक सेलिब्रिटींच्या बाळांना चॅलेंज दिलंय. त्यात सैफ अली खानचा तैमुर,  तुषार कपूरचा लक्ष्य, करण जोहरची मुलं यश आणि रुही, सलमानचा भाचा आहिल यांना फिटनेस चॅलेंज दिलंय. सध्या सगळीकडे या व्हिडिओची चर्चा सुरू आहे.

करण जोहरनंही या व्हिडिओचं खूप कौतुक केलंय. त्यानं राहीलला राॅक स्टार म्हटलंय.

या फिटनेस चॅलेंजची सुरुवात केंद्रीय मंत्री राघवेंद्र राठोड यांनी केली होती.  हे चॅलेंज अनुष्का शर्मा, टायगर श्राॅफ, हृतिक रोशन, विराट कोहली, मेरी काॅम आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वीकारलं होतं. आरोग्यपूर्ण शरीर आणि मन हे नेहमीच महत्त्वाचं असतं. म्हणूनच हे फिटनेस चॅलेंजचं प्रमोशन व्हायरल झालंय.

लढवय्या सैनिकांना जाणून घेण्यासाठी 'पलटन' पाहायला हवा- अर्जुन रामपाल

First published: August 30, 2018, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading