मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड

#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड

न्यूज18लोकमतच्या वेबसाईटशी बोलताना निशिगंधा म्हणाली, 'ती बोलतेय हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या ज्या महिलांनी वाचा फोडली ते योग्यच आहे. मग ती कितीही वर्षांनी बोलू दे, वाचा फोडली हे महत्त्वाचं आहे.

मुंबई, 16 आॅक्टोबर :  #MeToo चळवळ जोरात सुरू आहे. बाॅलिवूडमध्ये लैंगिक गैरवर्तणूक करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला जातोय. याबद्दल अभिनेत्री डाॅ. निशिगंधा वाडनंही आपलं मत व्यक्त केलंय. न्यूज18लोकमतच्या वेबसाईटशी बोलताना निशिगंधा म्हणाली, 'ती बोलतेय हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या ज्या महिलांनी वाचा फोडली ते योग्यच आहे. मग ती कितीही वर्षांनी बोलू दे, वाचा फोडली हे महत्त्वाचं आहे. त्यात तिची हिंमत आहे. कुठल्या संधीसाठी हात पुढे करताना, आपल्या हातून चूक झाली नाही ना तेही तपासून पहावं.'

ती पुढे म्हणाली, 'आपल्याला #MeToo म्हणायचं असेल तर ते सकारात्मक असावं. आपल्याकडे स्त्रीला कायद्याचं पाठबळ असतं. कारण स्त्री ही शोषितवर्ग होती. ते बरोबरही आहे. पण हे जे घडलं ना त्यात दोन गोष्टी बघायला हव्यात. तिनं संधी मिळण्यासाठी थोडा हात पुढे केला आणि त्यानं विकल्प केला, तर चूक ही त्याचीच आहे. त्याला शासन व्हायला हवं. पण हे का झालं हेही पाहायला हवं.'

निशिगंधा म्हणाली, 'एखाद्या दिग्दर्शकावर विनयभंगाचा आरोप बऱ्याच जणी करतात, तेव्हा विचारवंसं वाटतं, बाई गं तो तुझ्या घराची बेल वाजवून आत आला होता की तू गेली होतीस. तेव्हा स्त्रीनं जपून राहिलं पाहिजे, हे मी सांगते यात मी संकुचित नाही होत. माझ्या 18 वर्षाच्या मुलीला हेच सांगते. कुणी अनोळखी समोर आला तर त्याच्या नजरेत नजर मिसळायची नाही. जिला या व्यवसायात यायचंय तिला मी सांगणारच. फेमिनिझम म्हणजे तोकडे कपडे घालणं, पदर खाली पाडणं नाही.'

निशिगंधा म्हणाली, 'माझा कुठल्याच जातीवर विश्वास नाही. दोनच जाती आहेत. स्त्री आणि पुरुष. तुम्ही ज्या जातीचे आहात त्यात जपून राहायला हवं. स्त्रीनं स्वत:च्या महत्त्वाकांक्षी वृत्तीला तपासून पहावं. एखाद्या संधीसाठी किती मागे पळायचं?  त्या संधीसाठी कुणी अवाजवी अपेक्षा ठेवली, तर नाही म्हणण्याची हिंमत हवी.'

PHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा

First published:

Tags: #MeToo, Marathi acteress, Nishigandha wad, निशिगंधा वाड