Home /News /entertainment /

नुकतचं लग्न झालेल्या अभिनेत्रीने शेअर केला आपल्या मेंदीचा फोटो, ओळखा पाहू ही कोण?

नुकतचं लग्न झालेल्या अभिनेत्रीने शेअर केला आपल्या मेंदीचा फोटो, ओळखा पाहू ही कोण?

या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिच्या मेंदीचा पहिला फोटो समोर आला आहे.

  मुंबई, 12 मे- महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीनं 7 मेला लंडनमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस(first wedding anniversary ) साजरा केला. मात्र नुसता लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला नाही तर तिनं पुन्हा एकदा (Sonalee Kulkarni Wedding in London ) विधीवत लग्न केल्याबद्दल नुकतचं तिनं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं होतं. तिनं लग्न कधी, कुठे, कसं झालं याबद्दल सांगितलं नसलं तरी आता सोनाली कुलकर्णीच्या मेंदीचा पहिला फोटो समोर आला आहे. तिच्या हातावर मेंदी खूपच सुंदर दिसत आहे. सोनाली कुलकर्णीनं नुकताच तिच्या मेंदीचा फोटो इन्स्टा स्टोरील शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या हातावर आणि पायवर सुंदर मेंदी काढल्याचं दिसत आहे. मेंदी छान कुणालच्या प्रेमाचा रंग चढल्याचे या फोटोत दिसत आहे. कारण मेंदी मस्त अशी लाल भडक रंगली आहे. सोनालीच्या हातावर ती खूपच शोभून आणि तितकीच सुंदर अशी दिसत आहे. जेव्हापासून चाहत्यांसोबत तिनं कुणालसोबत दुसरं लग्न केल्याबद्दल शेअर केलं आहे. तेव्हापासून या स्वीट कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. सोनालीनं लग्नाबद्दल सविस्तर सांगितलं नसलं तरी चाहत्यांना मात्र याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. वाचा-कतरिना ते प्रियांका या अभिनेत्रींना अभिनयाशिवाय 'या' गोष्टींमध्ये आहे रुची सोनालीनं काल 11 मे रोजी एक फोटो शेअर केला होता. यामध्येच फायनली सोनाली वेड्स कुणाल असं म्हटलं होतं. सोबत तिनं एक पोस्ट देखील लिहिली होती. तिनं म्हटलं होतं की, ''#pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा.मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं. Zoom call वरून साक्षीदार झाले.पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अशा आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं.यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सहकुटुंब - सह परिवार - ठरल्या प्रमाणे - संपूर्ण विधीपूर्वक - मराठमोळ्या पद्धतीने - अगदी स्वप्नवत - लग्न केलं 🙏🏻P.S. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं - सगळं share करू “लवकरच” !तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या 🙏🏻'' सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनालीनं पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे की, लग्न कसं झालं, कुठं झालं याबद्दल लवकरच सांगणार आहे.
  सोनालीने 7 मे रोजी दुबईमध्ये कुणालशी ( Sonalee Kulkarni Kunal Benodekar first wedding anniversary ) लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते. कोरोना असल्यामुले तिला लग्नासाठी तिचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करता आले नाही. म्हणूनच सोनालीनं आता पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या