S M L

कपिल शर्मा परत येतोय!

तो आला की लोकांना हसायला मिळतं. बरोबर ओळखलंत. कपिल शर्मा परत येतोय.

Updated On: Aug 30, 2018 10:01 AM IST

कपिल शर्मा परत येतोय!

मुंबई, 30 आॅगस्ट : तो परत येतोय. त्याच्याबद्दल बरेच वाद झाले. चर्चा झाल्या. टीका झाल्या. त्याच्या आजाराबद्दलही बातम्या आल्या. तरीही लोक त्याची वाट पाहतायत. कारण तो आला की लोकांना हसायला मिळतं. बरोबर ओळखलंत. कपिल शर्मा परत येतोय.

कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरू होतोय. याही वेळी तो चॅटच्या स्वरूपात असेल. थोडेफार बदल असतील. पण कपिल पुन्हा एकदा उभा राहिलाय. रक्षाबंधनला तो आपल्या कुटुंबाला येऊन भेटला.

याच दरम्यान कपिल निर्माता म्हणूनही दिसणार आहे.‘सन आॅफ मनजीत सिंग’ हा पंजाबी चित्रपट कपिल प्रोड्यूस करतोय. आॅक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

द कपिल शर्मा'च्या पहिल्या सीझनमध्ये काहीच नवे बदल होत नसल्याने कपिलने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच कपिल आणि सुनिल ग्रोवर मध्येही यादरम्यान मतभेद निर्माण झाले. मात्र आता या नव्या सीझनमध्ये शोचा कायापालट होताना दिसणार आहे. शोच्या या नव्या सीझनमध्ये नक्की कोण कोणते कलाकार झळकणार हे अजुनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय.

कपिल शर्माचा शो सोनी वाहिनीनं बंद केला होता. कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणानंतर हा शो बंद होणार अशा खूप चर्चा रंगल्या. सरतेशेवटी हा शो बंद झालाच. अर्थात, सोनीनं कपिल शर्मा शो बंद करताना छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा हा शो परत येईल असं म्हटलं होतं.

Loading...
Loading...

कपिल शर्माची तब्येत बरी नसते. त्यामुळे हा शो तात्पुरता बंद होतोय, असंही म्हटलं होतं. पण खरी कारणं वेगळी आहेत. कपिल आणि त्याच्या टीममध्ये वितुष्ट आल्यानंतर या शोचा टीआरपी कमी झाला. त्यामुळे वाहिनीनं हा निर्णय घेतला होता.

VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 09:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close