गुरू आणि विक्रांत सरंजामेंनी केलं गणपती पूजन, पहा सेलिब्रिटी बाप्पा

गुरू आणि विक्रांत सरंजामेंनी केलं गणपती पूजन, पहा सेलिब्रिटी बाप्पा

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला अभिजीत खांडकेकर म्हणजेच गुरू भले शनाया आणि राधिकाच्या कात्रीत अडकला असला तरी तो घरी गणपतीला आलाय.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : सगळीकडे बाप्पाचं आगमन झालंय. वातावरण मंगलमय झालंय. अनेक सेलिब्रिटींनी घरी गणपती आणलाय. आणि सोशल मीडियावर गणरायाचे फोटो टाकलेत.

अभिनेता सुबोध भावेच्या घरीही गणपती आहे. सुबोधनं फेसबुकवर फोटोसोबत प्रार्थनाही केलीय. तो लिहितो, ' ज्या कारणाने गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, त्या राष्ट्रहितासाठी आम्हाला आपआपसातील भेद मिटवून एकत्र येण्याची सुबुद्धी दे गणराया, सर्वाना सुखी,आनंदी आणि निरोगी ठेव हे सुखकर्ता, सूर निरागस हो

अभिनेता स्वप्नील जोशीकडेही गणपती येतो. त्यानंही बाप्पाचा फोटो पोस्ट केलाय.

अभिनेत्री हेमांगी कवी ही निसर्गालाच देव मानते. ती तिचा मित्र विशाल शिंदेच्या स्टुडिओत घडलेल्या गणपतीच्या मूर्तींचे फोटोज पोस्ट करतेय. हे गणपती खूपच वेगळे आहेत. त्यांना मानवी रूप दिलंय.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं इन्स्ट्राग्रामवर आपल्या घरच्या बाप्पाचे फोटोज टाकलेत आणि शुभेच्छा दिल्यात.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला अभिजीत खांडकेकर म्हणजेच गुरू भले शनाया आणि राधिकाच्या कात्रीत अडकला असला तरी तो घरी गणपतीला आलाय. फेसबुकवर त्यानं आपल्या बायकोबरोबर बाप्पाचा फोटो पोस्ट केलाय.

तमाम महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकरांनीही त्यांच्या घरच्या शाडूच्या मूर्तीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केलाय.

एरवी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारे हे कलाकार सणासुदीला आपापल्या घरी आपल्यासारखाचं सण एंजाॅय करत असतात. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले बाप्पा व्हायरल झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 10:38 AM IST

ताज्या बातम्या