मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नवी शनाया पास की नापास? 'असा' आहे प्रेक्षकांचा कौल

नवी शनाया पास की नापास? 'असा' आहे प्रेक्षकांचा कौल

आतापर्यंत नव्या शनायाचे तीन भाग प्रसारित झालेत. सर्वसामान्यांना ही नवी शनाया कशी वाटली?

आतापर्यंत नव्या शनायाचे तीन भाग प्रसारित झालेत. सर्वसामान्यांना ही नवी शनाया कशी वाटली?

आतापर्यंत नव्या शनायाचे तीन भाग प्रसारित झालेत. सर्वसामान्यांना ही नवी शनाया कशी वाटली?

    मुंबई, 5 सप्टेंबर : तो दिवस होता रविवारची रात्र. रात्री 9 वाजल्यापासून सगळे जण कसे आपापल्या घरी टीव्ही समोर बसून होते. कारण प्रत्येकाला उत्सुकता होती ती शनायाची. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतली शनाया बदलली. त्या दिवशी ईशा केसकरनं मालिकेत एन्ट्री घेतली. तीही अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये. आतापर्यंत नव्या शनायाचे तीन भाग प्रसारित झालेत. सर्वसामान्यांना ही नवी शनाया कशी वाटली?

    महाराष्ट्र काॅलेजमध्ये प्रोफेसर असणाऱ्या निर्मला सबनीस नियमित ही मालिका पाहतात. त्यांना या बदलाबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ' मला तर जुनीच शनाया आवडते. ती स्मार्ट होती. आणि त्यात ती जो काही बालीशपणा दाखवायची, ती तिच्या व्यक्तिरेखेला एकदम समर्पक होता.' नव्या शनायाबद्दल त्या म्हणाल्या, 'एक तर त्याच वाहिनीवर ईशानं बानूची भूमिका प्रभावीपणे केली होती. आता बानूला माॅडर्न रूपात पाहणं आणि शनाया म्हणून पचवणं कठीण जातंय.' निर्मला सबनीस यांना नवी शनाया भडकच वाटतेय.

    गृहिणी असलेल्या मुंबईच्या मैथिली जोशींनाही नवी शनाया फारशी आवडली नाही. त्या म्हणाल्या, 'रसिकानं उभी केलेली शनाया निगेटिव्ह असली तरीही तिचा राग यायचा नाही. उलट तिच्यात एक गोडवा होता. पण आता नव्या शनायामध्ये तो गोडवा मीसिंग आहे. उलट ती जास्त खलनायिका वाटतेय.'

    पुण्याच्या रत्नावली नामजोशी, अलिबागच्या साधना पंडित यांनाही हा बदल फारसा रुचलेला नाही. रसिकाच्या जागी ईशाला पाहणं कठीण जातं. या दोघींचंही एकमत पडलं. 'ईशा बानू म्हणून खूपच चांगली भूमिका करायची. ती अजूनही लक्षात आहे. पण आता हट्टी, माॅडर्न शनाया म्हणून तिला पाहणं काठीण जातंय.'

    या मालिका जास्त करून महिलावर्गच पाहतात. पण काही पुरुषही घरी बायकोनं मालिका लावली तर ती आवर्जून पाहतात. श्रीरंग पाटील एक व्यावसायिक आहेत. ते 'माझ्या नवऱ्याची बायको' नेहमीच पाहतात. त्यांना ही नवी शनाया खूप आवडली. ' ईशा केसकर या भूमिकेत एकदम चपखल बसलीय. तिचा बदललेला अॅटिट्यूड तिला एकदम सूट होतोय. ती दिसतेयही सुंदर.' श्रीरंग नव्या शनायावर खूश आहेत. ते असंही म्हणाले, शनायाचा जो बदललेला अॅप्रोच दाखवलाय तो रसिकाला कदाचित जमला नसता.

    निवृत्त झालेले विनित मांद्रेकरही जुन्या शनायाचे फॅन आहेत. त्यामुळे नवी शनाया काही त्यांना फारशी रुचली नाही. ते म्हणाले, ' पहिली शनाया बिनडोक आणि बिनधास्त होती. रसिकानं ती योग्य साकारलीय. आता ईशा चेहऱ्यावरून मॅच्युअर वाटते. तिच्यात तो बालीशपणाही नाही. त्यामुळे नवी शनायाचा पुढे किती प्रभाव पडेल ते सांगता येणार नाही.'

    सर्वसामान्यांच्या मनात जुनी शनाया ठसली होती. दोन वर्ष तिची सवय झाली होती. आता नव्या शनायाचं बदललेलं रूप स्वीकारायला थोडा वेळ तर लागणारच.

    VIDEO : अकोला जिल्हाधिकाऱ्यांची 'मुन्ना भाई' स्टाईल गांधीगिरी!

    First published: