Big Boss 12 : जसलीननं सगळ्यांसमोर केलं अनुप जलोटांना किस, VIDEO व्हायरल

Big Boss 12 : जसलीननं सगळ्यांसमोर केलं अनुप जलोटांना किस, VIDEO व्हायरल

जसलीननं अनुप जलोटांचा किस घेतला. तोही एकदा नाही, दोनदा. बिग बाॅसच्या सगळ्या सदस्यांसोबत.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : 'बिग बाॅस 12'मध्ये रोजच काही ना काही गमतीजमती पाहायला मिळतात. बरेच दिवस तरी अनुप जलोटा आणि जसलीनच्या रिलेशनशिपबद्दलच चर्चा होती. आधी धक्का, आश्चर्य, मग खरं आहे की शोसाठी अशा शंकाही उपस्थित केल्या जात होत्या. पण बिग बाॅसमध्ये जसलीननं सगळ्यांना चकित केलं.

जसलीननं अनुप जलोटांचा किस घेतला. तोही एकदा नाही, दोनदा. बिग बाॅसच्या सगळ्या सदस्यांसोबत. सगळे सदस्यही बघत राहिले. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

जसलीनच्या वडिलांनी त्यांना या नात्याबद्दल यापूर्वी काहीही माहीत नव्हतं. ‘मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की, गुरू शिष्याच्या स्वरूपात दोघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. तिथे ते रियाज करतील आणि गाणी गातील. दोघांच्या नात्याबद्दल जेव्हा कळलं तेव्हापासून संपूर्ण कुटुंबीय धक्क्यात आहेत.’

पुढे ते म्हणाले की, ‘हे माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अविश्वसनीय होतं. त्या दोघांनी प्रेमाची संमती देता आमच्या घरात एकप्रकारची शांतता पसरली. सर्वच काळजीत पडले. १० मिनिटांच्या आत नातेवाईकांचे फोन यायला सुरूवात झाली. घरातले वातावरण एका क्षणात बदलले.’

अनुप आणि जसलीन यांची ओळख कशी झाली या प्रश्नाचं उत्तर देताना केसर म्हणाले की, ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून अनूप यांना ओळखतो. अनूपजी, जगजीतजी यांच्यासोबत मी काम केलं आहे. अनुपजी यांना मीच माझ्या कुटुंबियांशी भेटवले होते. गेल्या तीन- चार वर्षांपासून जसलीन अनुप यांच्याकडे संगीताची तालीम घेतेय. कधी ते आमच्या घरी शिकवायला यायचे तर कधी जसलीन त्यांच्या घरी जायची. या दोघांमध्ये असे काही चालत असेल याचा घरातल्यांना संशयही आला नाही.’

Success Story : नालेसफाई करत थेट गाठली केबीसीची हॉट सीट आणि जिंकले...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 11:33 AM IST

ताज्या बातम्या