'बिग बाॅस 11'ची विजेती शिल्पा शिंदेनं जलोटा-जसलीनच्या नात्याबद्दल 'हे' सांगितलं

'बिग बाॅस 11'ची विजेती शिल्पा शिंदेनं जलोटा-जसलीनच्या नात्याबद्दल 'हे' सांगितलं

65 वर्षांचे जलोटा आणि 28 वर्षांची जसलीन. टाॅक आॅफ द टाऊन आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतायत.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : 'बिग बाॅस 12' अगदी दणक्यात सुरू झाला. कधी नव्हे ते 'बिग बाॅस12'ची इतकी प्रसिद्धी झाली ती अनुप जलोटा आणि जसलीनमुळे. 65 वर्षांचे जलोटा आणि 28 वर्षांची जसलीन. टाॅक आॅफ द टाऊन आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतायत.

'बिग बाॅस 11'ची विजेती शिल्पा शिंदेनंही आता यावर आपलं मत व्यक्त केलंय. 'दोन व्यक्ती एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहेत. त्यांच्यात एक बंध तयार झालेत, यात चुकीचं काय आहे?' ती म्हणते. शिल्पाला यात काहीच चुकीचं वाटत नाही.

शिल्पा म्हणाली, ' अनुपजींसारखे अनेक जण अशा रिलेशनशिपमध्ये आहेत. पूर्वी मुलगी पुरुषापेक्षा लहान असावी, म्हणायचे. आता तसं काही राहिलं नाहीय.' शिल्पाच्या मनात कदाचित प्रियांका-निक असतीलही.

शिल्पा म्हणाली, बऱ्याच गोष्टी बंद दारामागे होत असतात, जलोटांनी नातं कबूल करायला धाडस दाखवलंय. तिला याबद्दल दोघांचा आदर आणि कौतुक आहे.

बिग बॉस १२ या रिअॅलिटी शोला रविवार १६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. हा रिअलिटी शो अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. सध्या बिग बॉस १२ मध्ये भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची प्रेयसी जसलीन मथारू यांच्या नात्याबद्दलच चर्चा होताना दिसत आहेत. अनुप यांनी बिग बॉसच्या मंचावरच आपल्या प्रेमाची कबूली दिली.

अनुप आणि जसलीन यांनी बिग बॉसमध्ये ‘विचित्र’ जोडी म्हणून प्रवेश केला आहे. या दोघांना ‘विचित्र’ जोडी म्हटलं जातंय याच मुख्य कारण म्हणजे दोघांच्या वयात ३७ वर्षांचं अंतर आहे. २८ वर्षांची जसलीन आणि ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या साडे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्याची कबूली देताना जसलीन म्हणाली की, 'आतापर्यंत आमच्या नात्याबद्दल कोणालाच माहित नव्हते. पण आता आम्ही जगाला आमच्या नात्याबद्दल सांगायला तयार झालो आहोत.'

आसाममध्ये गणेशोत्सवात रंगला अजिंक्य-शीतलचा डान्स

First published: September 20, 2018, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading