फोटोगॅलरी- सेलिब्रिटी 'असं' करत आहेत नवीन वर्षाचं स्वागत

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2017 07:41 PM IST

फोटोगॅलरी- सेलिब्रिटी 'असं' करत आहेत नवीन वर्षाचं स्वागत

 2017चं वर्ष गाजवणारा राजकुमार राव त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत थायलँडला रवाना झालाय.  आलिया भटने यंदाचं न्यू इयर आपल्या जीवलग मैत्रीणींसोबत साजरं करायचं ठरवलंय.  सध्या ती सिंगापूरला गेली आहे.  टेलिव्हीजनची क्वीन एकता कपूरनेही तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून लॉस एन्जेलिस गाठलंय. इथं आपल्या काही मैत्रीणींसोबत ती नव्या वर्षाचं स्वागत करेल. लाखों दिलों की धडकन माधुरी दीक्षितही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जपानला रवाना झालीय जॅकलीन फर्नांडिस मात्र मिळालेली सुट्टी आपल्या कुटुंबियांसोबतच श्रीलंकेत एन्जॉय करतीये. तिथेच आपल्या नातेवाईकांसोबत तो नववर्षाचं ग्रॅण्ड स्वागत करेल.. सैफ अली खान आणि करिना कपूर हे दोघे तैमूरसोबत काही दिवसांपूर्वीच परदेशात रवाना झालेत..नववर्षाचं स्वागत ते न्यू यॉर्कमध्ये आपल्या जवळच्या मित्रमैत्रीणींसोबत करतील.. अक्षय कुमारचं आवडतं डेस्टीनेशन आहे साऊथ आफ्रिकेतलं केप टाऊन. तो आणि ट्विंकल सध्या तिथेच हॉलिडे साजरा करत आहेत.  विरूष्काची जोडी काही दिवसांपूर्वीच साऊथ आफ्रिकेसाठी रवाना झालीय. हे दोघे तिथेच नववर्षाचं स्वागत करणार असून त्यानंतर अनुष्का परत येईल तर विराट तिथेट साऊथ आफ्रिकेसोबतची सिरिज खेळणार आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...