मुंबई, 20 आॅगस्ट : सिनेमाचा प्रभाव जनमानसावर असतो, हे तर आपण नेहमीच बघत असतो. बाॅलिवूडमध्ये हल्ली अनेक बायोपिक बनतायत. यामुळे इतिहास लोकांपर्यंत पोचत असतो. भाग मिल्खा भाग सिनेमामुळे आपल्याला धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्याचा पट कळला. पण त्याचा प्रभाव पश्चिम बंगालच्या शालेय पाठ्यपुस्तकं बनवणाऱ्यांवर व्हावा, म्हणजे नवलच म्हणायला हवं.
पश्चिम बंगालच्या शाळेत पाठ्यपुस्तकात एक धडा आहे मिल्खा सिंग यांच्यावर. आणि त्यात फोटो आहे तो चक्क फरहान अख्तरचा. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या भाग मिल्खा भाग सिनेमात फरहान अख्तरनं मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. पाठ्यपुस्तक मंडळांनी ही भयंकर घोडचूक केलीय. ही चूक पहिल्यांदा लक्षात आली ती घोष नावाच्या व्यक्तीला. त्यानं ती ट्विट केली, तर फरहान अख्तरनं ते रिट्विटही केलं.
To the Minister of School Education, West Bengal. There is a glaring error with the image used in one of the school text books to depict Milkha Singh-ji. Could you please request the publisher to recall and replace this book? Sincerely. @derekobrienmp https://t.co/RV2D3gV5bd
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) 19 August 2018
फरहाननं म्हटलंय, पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. आणि ही चूक दुरुस्त करावी. कला, क्रिडा आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यात आले आहेत. मुळात चित्रपटांच्या माध्यमातून अशा बऱ्याच व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पण, या चित्रपटांचा प्रभाव किंवा मग प्रस्थ आता इतकं वाढलं आहे, की थेट शालेय अभ्यासक्रमातही त्याचेच पडसाद उमटताना दिसत आहेत. खुद्द अभिनेता फरहान अख्तरनेच याविषयीची खंत व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: West bengal