#ThackerayTrailer Launch : 'मेरा विचार लाखो लोगों के खून मे बहेगा'

#ThackerayTrailer Launch : 'मेरा विचार लाखो लोगों के खून मे बहेगा'

बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर आज दिमाखात लाँच झाला. मुंबईच्या आयमॅक्स थिएटरबाहेर ढोलताशांचा गजर सुरू होता. शिवाय लेझीम पथकही होतं. असा मराठमोळा थाट ट्रेलर लाँचच्या वेळी दिसत होता.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर आज दिमाखात लाँच झाला. मुंबईच्या आयमॅक्स थिएटरबाहेर ढोलताशांचा गजर सुरू होता. शिवाय लेझीम पथकही होतं. असा मराठमोळा थाट ट्रेलर लाँचच्या वेळी दिसत होता.

ट्रेलरमध्ये बाळासाहेबांचे जुने दिवस, नंतरचा संघर्ष,दंगली सगळ्या गोष्टी दाखवल्यात. यात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखाही दिसते. बाळासाहेबांच्या भाषणांची झलकही यात दिसते.

नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत आहे, हे तर सगळ्यांनाच माहितीये.अभिजीत पानसे दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग मागेच संपलं.  काही दिवसांपूर्वी नवाजने या सिनेमाच्या डबिंगला सुरूवात केली होती.काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चक्क मराठीत 'माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो...आजपासून डबिंगची सुरूवात केलीय,' अशी पोस्ट टाकली होती. त्याची ही पोस्ट वाचून बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

काही दिवसांपूर्वी बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर मोठ्या दिमाखात लाँच झाला. अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लाँच झाला. १९९३च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरील 'ठाकरे' सिनेमाचा टीझर  लाँच करण्यात आला. या सिनेमातून शिवसेना मनसेची अनोखी युती पाहायला मिळतेय. सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते संजय राऊत करतायत, तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे करत आहेत.23 जानेवारी 2019ला हा सिनेमा रिलीज होईल.

या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दिकीने बरीच मेहनत घेतल्याचं दिसतंय.  सफेद कुर्त्यामध्ये गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोळ्यांवरील चष्मा, डोक्यावरील केसांची स्टाईल, हातांची लकब हे सर्व काही बाळासाहेबांसारखंच पाहायला मिळतंय. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा कसलेला अभिनेता आहे.

एका मुलाखतीत नवाजुद्दीननं हे स्पष्ट केलं. तो बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारतोय. त्याचं शूटिंग सुरू आहे. तो म्हणतो, ' बाळासाहेब धाडसी होते. त्यांची भूमिका करताना ते धाडस माझ्यात आलंय. मी माझ्या बायकोला घाबरत नाही. आता मी घरी बायकोशी वरच्या पट्टीत बोलू शकतो.'

First published: December 26, 2018, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading