Video : सोनाली कुलकर्णी पुन्हा अप्सरेच्या रूपात

Video : सोनाली कुलकर्णी पुन्हा अप्सरेच्या रूपात

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची 'अप्सरा' अजरामर झाली. आजही अनेक शोमध्ये तिला 'अप्सरा आली'चीच फर्माईश केली जाते. पुन्हा एकदा फॅन्सना ही अप्सरा पाहायला मिळेल.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची 'अप्सरा' अजरामर झाली. आजही अनेक शोमध्ये तिला 'अप्सरा आली'चीच फर्माईश केली जाते. पुन्हा एकदा फॅन्सना ही अप्सरा पाहायला मिळेल.

झी युवावर अप्सरा आली हा लावण्यांचा शो सुरू होतोय. त्याचे परीक्षक आहेत सोनाली कुलकर्णी, दीपाली सय्यद आणि सुरेखा पुणेकर. या शोचं सूत्रसंचालन करणार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. संतोष कोल्हे या शोचं दिग्दर्शन करणार आहेत.

कलर्स मराठीवर ढोलकीच्या तालावर हा रिअॅलिटी शो होता. त्याचीच ही आवृत्ती आहे. यात एकूण 14 लावण्यवतींनी भाग घेतलाय. त्यातल्या काही परदेशीही आहेत. सगळ्या प्रकारच्या लावण्या या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यातूनच विजेतीची निवड होईल.

अनुभवी लावणी कलाकार सुरेखा पुणेकर परीक्षक असल्यानं  या त्या प्रत्येकाला लावणीतले बारकावे समजावून सांगणार आहेत. परीक्षक म्हणून प्रत्येकीची तशी परीक्षा घेतली जाईल.

सोनालीचे दोन सिनेमे तयार आहेत. एक मृणाल कुलकर्णीनं दिग्दर्शित केलेली ती अँड ती. दुसरी अमृता सुभाषसोबत तिचा सिनेमा येतोय.

सोनाली फिटनेसबद्दल खूपच जागरुक आहे. ती म्हणते, 'आजकाल तुमचं वय काय, तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात याचा आणि फिटनेसचा काहीही संबंध नाही. हल्ली ग्लोबल वाॅर्मिंग वाढलंय, तणाव वाढलाय, स्पर्धा वाढलीय.. त्यामुळे प्रत्येकालाच फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. आणि फिटनेस म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक फिटनेसही महत्त्वाचा. आपण त्यालाच महत्त्व देत नाही. तुमचं मन नियंत्रणात नसेल तर शरीराचा फिटनेस कितीही ठेवलात तरी त्याचा उपयोग नाही.'

First published: December 3, 2018, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading