नेहा पेंडसेनंतर 'या' मराठी अभिनेत्रीची Big Boss हिंदीच्या घरात एन्ट्री

नेहा पेंडसेनंतर 'या' मराठी अभिनेत्रीची Big Boss हिंदीच्या घरात एन्ट्री

नेहाला बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. आता एक नवा मराठी चेहरा बिग बाॅसमध्ये येतोय.

  • Share this:

विराज मुळे, मुंबई, 22 आॅक्टोबर : 'बिग बाॅस12'चा हा सीझन चांगलाच गाजतोय. त्यातला मराठमोळा चेहरा नेहा पेंडसेला पाहून मराठी प्रेक्षक खूश झाले होते. पण नेहाला बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. आता एक नवा मराठी चेहरा बिग बाॅसमध्ये येतोय.

मराठी 'बिग बॉस' जिंकून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री मेघा धाडे आता चक्क हिंदी 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेण्यासाठी सज्ज झालीय. बिग बॉसचा कोणताही एक सीझन जिंकलेला स्पर्धक हिंदी 'बिग बॉस'मध्ये थेट एंट्री घेण्याची ही आजवरची पहिलीच वेळ आहे.

बिग बाॅसच्या घरात जायला मिळतेय याबद्दल मेघा एकदम खूश आहे. ती म्हणाली, ' मला मराठी बिग बाॅसमध्ये प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळालाय. त्यामुळे आता याही बिग बाॅसमध्ये मिळेल.' मेघाला विश्वास आहे.

मध्यंतरी मेघाच्या घराचं शिफ्टिंग सुरू होतं. त्यामुळे तिला 'बिग बाॅस 12'चे फार एपिसोड्स पाहता आले नाहीयत. पण बिग बाॅसच्या घरात तिला बराच काळ राहायचंय.

मेघा म्हणाली, ' मी बिग बाॅसच्या घरात खऱ्याची बाजू घेईन. मी उगाच कुणाला खूश करण्यासाठी खोटं वागणार नाही.'

सर्व स्पर्धकांवर मात करत अभिनेत्री मेघा धाडेने बाजी मारली होती.  कलर्सच्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा किताब पटकावला. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला धडाक्यात सुरूवात झाल्यानंतर सर्वांनाच प्रचंड उत्सुकता होती. चुरशीच्या या लढतीत मेघाने बाजी मारली.

१५ एप्रिल रोजी सुरू झालेला बिग बॉस मराठीचा खेळ अनेक कारणांनी गाजला. बिग बॉसच्या घरात जवळपास १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दररोज नवीन वाद, नवीन टास्क, टास्कदरम्यान सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली कुरघोडी यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

'विरुष्का'च्या पावलांवर पाऊल, जगातील सर्वात सुंदर जागी दीपिका- रणवीर करणार लग्न

First published: October 22, 2018, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading