News18 Lokmat

VIDEO : एकता कपूरच्या 'गंदी बात 2'च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार

एकता कपूरनं गंदी बात ही वेब सीरिज आणली होती. ती प्रचंड चालली. ही खूप बोल्ड सीरिज होती. आता पुन्हा एकदा ती घेऊन आलीय गंदी बात 2.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 06:03 PM IST

VIDEO : एकता कपूरच्या 'गंदी बात 2'च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार

मुंबई, 03 जानेवारी : टीव्ही जगतात मालिकांची क्वीन असलेली एकता कपूर आता वेब सीरिजवर आपलं अधिराज्य गाजवतेय. ऑल्ट बालाजीतर्फे तिनं अनेक लोकप्रिय शोज बनवलेत.

एकता कपूरनं गंदी बात ही वेब सीरिज आणली होती. ती प्रचंड चालली. ही खूप बोल्ड सीरिज होती. आता पुन्हा एकदा ती घेऊन आलीय गंदी बात 2. नुकतंच त्याचं ट्रेलर रिलीज झालंय. ते पाहून कुणालाही घाम फुटू शकतो.

या व्हिडिओत सेक्स आणि बोल्डनेसचा भडीमारच आहे. एकता कपूरनं ही सीरिज पहावी म्हणून ट्रेलरच इतका बोल्ड केला असावा.Loading...

याशिवाय गंदी बात 2चा टायटल ट्रॅकही रिलीज झालाय. तोही तितकाच बोल्ड आहे. आ दिल बहला दू तेरा गंदी बात से असे गाण्याचे बोल आहेत. तोही खूप व्हायरल होतोय.याशिवाय एकता कपूरही एक बोल्ड वेबसीरिज घेऊन आलीय. तिचं नाव आहे ' XXX' , ट्रिपस एक्स. यात सेक्स, महिला आणि काँट्रोव्हर्सी हे विषय हाताळलेत.

या सीरिजमध्ये शांतनु महेश्वरी, अंकित गेरा, रित्विक धंजानी यांची मुख्य भूमिका आहे. बोल्डनेसची सगळी जबाबदारी पेललीय कायरा दत्त आणि मेहरीन माजदा यांनी.

या ट्रिपल एक्समध्ये एकूण 5 कथा आहेत. रागिनी एमएमएस रिटर्न्स, लस्ट स्टोरीज, गंदी बात, सेक्रेड गेम्स यासारख्या बोल्ड सीरिज आतापर्यंत लोकप्रिय झाल्यात.

एकता कपूर आणि शाहरूख खाननं मिळून कसौटी जिंदगी की 2 या मालिकेचा प्रोमो शूट केला होता. आणि त्यासाठी किती पैसे घेतले ठाऊकेय? तब्बल 8 कोटी रुपये. त्यात किंग खाननं एकता कपूरसोबतच्या प्रोमोला 5 कोटी घेतले, तर नंतर तीन प्रोमो केले त्याला 1,1 कोटी घेतलेत.


जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार, आकडा ऐकून बसेल धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...