अली जफरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भडकली तापसी पन्नू, जाणून घ्या कारण

तापसी पन्नू नेहमीच तिच्या सडेतोडपणासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती बदला सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 11:00 AM IST

अली जफरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भडकली तापसी पन्नू, जाणून घ्या कारण

मुंबई, 02 मार्च : तापसी पन्नू नेहमीच तिच्या सडेतोडपणासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती बदला सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यात ती एका बिझनेसमॅनच्या पत्नीची भूमिका करतेय. हा एका खुनाच्या मामल्यात अडकतो.

अली जाफरवर तापसीचं वक्तव्य

बदलाच्या प्रमोशनदरम्यान तापसीला अली जाफरबद्दल प्रश्न विचारला. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाचं अली जफरनं कौतुक केलं. त्यानंतर अली जफर ट्रोल झाला. त्यावर तापसी म्हणाली, 'मला एक कळत नाही की तो पाकिस्तानी आहे, तर मग त्याच्या देशाला पाठिंबा देणारच.'

टाइम्स नाऊशी बोलताना तापसी म्हणाली, ' अली जफरवर आपण बंदी घातलीय. त्याबद्दल आम्ही खूश आहोत. पण समजा मी आपल्या देशाला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानी लोकांनी मला ट्रोल केलं, तर कसं वाटेल? पुलवामाच्या हल्ल्यानंतर मी देशाच्या बाजूनं उभी होते.'

हा मूर्खपणा आहे

Loading...

तापसी पुढे म्हणाली, ' तो त्यांचा देश आहे. त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांना पाठिंबा दिला नाही तर असंही तो ट्रोल होईलच. त्याच्याकडून अजून काही अपेक्षा ठेवणं हा मूर्खपणा आहे. इथे त्याच्यावर बंदी आहे. पण पाकिस्तानात तो काम करतोय. त्याच्या देशाला पाठिंबा देतोय, त्यात चूक काय?'

‘पिंक’ सिनेमानंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आगामी बदला सिनेमात दोघं एकत्र काम करत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ८ मार्चला प्रदर्शित होत आहे.

या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक मर्डर मिस्ट्री सोडवताना स्पष्ट दिसत आहे. 'बदला' या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट बॅनरकडून केली जात आहे.

शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हटलं की, ‘आता वातावरण बदलल्यासारखं वाटत आहे.’ याआधी शाहरुखने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना टॅग करून ‘मी तुमचा ‘बदला’ घ्यायला येत आहे. तयार रहा.’

याला उत्तर देताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘अरे शाहरुख ‘बदला’ घेण्याची वेळ निघून गेली.. आता सगळ्यांना ‘बदला’ दाखवण्याची वेळ आली आहे.’ सोशल मीडियावर बॉलिवूडच्या बादशहा आणि महानायकाचं हे संभाषण साऱ्यांनाच आवडलं होतं.


सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे उभे ठाकले एकमेकांच्या समोर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...