अजित वाडेकरांच्या आठवणींना उजाळा, आता दिसणार मोठ्या पडद्यावर

यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक म्हणून ख्याती असणारे दिवंगत क्रिकेटपटू अजित वाडेकर आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 09:31 PM IST

अजित वाडेकरांच्या आठवणींना उजाळा, आता दिसणार मोठ्या पडद्यावर

मुंबई, 19 एप्रिल : यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ख्याती असणारे दिवंगत क्रिकेटपटू अजित वाडेकर यांनी काम केलेला चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. क्रिकेटवर बरेच सिनेमे येतात आणि ते चांगले चालतातही. अगदी आमिर खानचा लगान तर कुणीच विसरू शकत नाही. मराठीतही आता 'बाळा' नावाचा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे आणि त्यात अजित वाडेकर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचं निधन होण्याआधी सिनेमाचं शूटिंग झालं होतं.

भारताच्या या माजी कर्णधाराचं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झालं होतं. क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात ते क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख त्यांना होती. कोणामध्ये किती क्षमता आहे,  हे त्यांना बरोबर माहीत असे. ‘बाळा’ चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशा प्रकारे घडवतात याची कथा या चित्रपटात दिसेल.

या भूमिकेबद्दल विचारणा केल्यानंतर ‘मला अभिनय जमणार नाही!’, असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘तुला अभिनय नाही तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे’, असं सांगितल्यानंतर अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला होता.

या चित्रपटात उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहिरीश जोशी हा नवा चेहरा दिसणार आहे. सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर यांची गाणी या चित्रपटात आहे.


Loading...

VIDEO : मनसेबाबत पार्थ पवारांचा महत्त्वाचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...