• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Ratris Khel Chale 3: अण्णांच्या तावडीतून अभिराम वाचू शकेल का?

Ratris Khel Chale 3: अण्णांच्या तावडीतून अभिराम वाचू शकेल का?

झी वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलिज केला. हा प्रोमो पाहून अण्णांची पुढची योजना काय? असा प्रश्ना तुम्हाला देखील पडेल.

 • Share this:
  मुंबई 18 ऑगस्ट: रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वात चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक आहे. गूढ आणि रहस्यमय कथानकामुळे ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता या मालिकेचे तीसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. (Ratris Khel Chale 3 tv show) अन् यामध्ये देखील अण्णा नाईक यांची दहशत प्रेक्षकांना पाहता येईल. दरम्यान झी वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलिज केला. हा प्रोमो पाहून अण्णांची पुढची योजना काय? असा प्रश्ना तुम्हाला देखील पडेल. मालिकेच्या कथानकानुसार मृत्यूनंतर देखील अण्णा आणि शेवंता यांनी वाडा सोडलेला नाही. त्यांचे अतृप्त आत्मे आजही वाड्यात फिरतात. परंतु मृत्यूमुळे एकरूप होणं त्यांना शक्य होत नाहिये... यासाठी त्यांना एका मानवी शरीराची गरज आहे. दरम्यान शेवंतानं अभिरामाच्या पत्नीचं शरीर पछाडलं अन् आता अण्णा अभिरामाच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायेत. या प्रकारात अण्णा यशस्वी होतील का? असा प्रश्न तुम्हाला हा प्रोमो पाहून पडेल. बजरंगी भाईजान फेम अभिनेत्री आर्थिक अडचणीत; उपचारासाठीही पैसे नाहीत, चाहत्यांकडे मदतीची मागणी
  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये 20 वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: