फरहानला तयार करायचाय नवा 'म्युझिकल बँड'

'लखनौ सेन्ट्रल' नावाचा एक नवा सिनेमा येतोय. या सिनेमात फरहानला एक म्युझिकल बँड तयार करायचा आहे आणि तोही एका जेलमध्ये. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Jul 27, 2017 05:35 PM IST

फरहानला तयार करायचाय नवा 'म्युझिकल बँड'

27 जुलै: अभिनेता फरहान अख्तरचा लवकरच 'लखनौ सेन्ट्रल' नावाचा एक नवा सिनेमा येतोय. या सिनेमात फरहानला एक म्युझिकल बँड तयार करायचा आहे आणि तोही एका जेलमध्ये. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय.

या सिनेमात फरहान किशन मोहन गिरहोत्राच्या भूमिकेत दिसतोय. या सिनेमात किशन या पात्राला एका आय.पी.एस.च्या हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावली जाते.

ट्रेलरवरून तरी किशनने ही हत्या केली नसल्याचं कळतं. आपल्या आयुष्यातले उरलेले दिवस जेलमध्ये घालवत असतो जेव्हा जेलमधल्या कैद्यांसाठी एक म्युझिकल बँड स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे निमित्त साधून फरहान जेलमधून पळून जायचा प्रयत्न करतो. तो खरंच पळून जाऊ शकेल की नाही हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

या सिनेमात रॉनित रॉय, डायना पेन्टी आणि दीपक डोब्रियालही प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 15 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close