शाहरुखच्या लेकीनं केलं पहिलंवहिलं मॅगझिन शूट!

शाहरुखच्या लेकीनं केलं पहिलंवहिलं मॅगझिन शूट!

पुन्हा एकदा मी तिला माझ्या हातात घेतलंय, ही प्रतिक्रिया होती बाॅलिवूडच्या किंग खानची. शाहरूख खानचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. बायको गौरी खान आणि तीन मुलं यांच्यासोबत तो नेहमीच वेळ घालवत असतो.

  • Share this:

मुंबई, 01 आॅगस्ट : पुन्हा एकदा मी तिला माझ्या हातात घेतलंय, ही प्रतिक्रिया होती बाॅलिवूडच्या किंग खानची. शाहरूख खानचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. बायको गौरी खान आणि तीन मुलं यांच्यासोबत तो नेहमीच वेळ घालवत असतो. सोशल मीडियावर हे पुन्हा पुन्हा आपण बघत असतो. बाॅलिवूडचा हा रोमान्सचा बादशहा मुलांचा विषय निघाला तर खऱ्या अर्थानं बापमाणूस असतो. त्यांच्या सुखदु:खात तो नेहमीच सहभागी असतो. सुहाना कव्हरपेजवर असलेल्या व्होग मासिकाचं प्रकाशन करताना, शाहरूखनं हे वरील उद्गार काढले.

आता शाहरुख खानची लाडली सुहाना खान चर्चेत आलेय एका खास कारणामुळे. किंग खानची ही लेक चक्क व्होगच्या कव्हरपेजवर झळकतेय. व्होगच्या मासिकावर सुहानाचा चेहरा रिव्हिल केला तोही शाहरुख खाननेच व्होग ब्युटी अवॉर्ड्सदरम्यान. सुहाना खान शाळा-कॉलेजमध्ये नाटकात सहभागी होत असे आणि तिला सिनेमा खूप आवडतो.त्यामुळे पित्याच्या पावलावर पाऊल टाकत तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको. व्होगचं हे कव्हरपेज याचीच पाऊलखूण तर नाही ना?

पण अनेकांनी यावर टीकाही केलीय. सुहाना खान इतक्या मोठ्या मासिकाच्या कव्हरपेजवर कशी काय? असा प्रश्न अनेकांनी विचारलाय. ही बाॅलिवूडची घराणेशाही आहे, असंही काहींनी म्हटलंय. मध्यंतरी सुहानाच्या वाढदिवसाला पप्पा शाहरुख खाननं तिला सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली. त्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

शाहरुखनं म्हटलंय, ' सगळ्या मुलींप्रमाणे तूही उडण्यासाठी बनलीयस. तू जे १६ वर्षांपासून करत होतीस, ते आता सर्व काही कायद्यानं करू शकतेस. '

किंग खानचा सुहानावर खूप जीव आहे. तो अगदी मित्राप्रमाणे मुलांशी वागतो. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला ६ लाख लाईक्स मिळाल्या होत्या.

First published: August 1, 2018, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading