हा पहा सुबोध भावेचा 'काशिनाथ घाणेकर' लूक

हा पहा सुबोध भावेचा 'काशिनाथ घाणेकर' लूक

याचं पोस्टर आज सुबोध भावेने सोशल मीडियावर प्रदर्शित केलं.यात सुबोधचा चेहरा एका आरशात दिसतोय.

  • Share this:

मुंबई, 27 आॅगस्ट : डाॅ. काशिनाथ घाणेकर म्हटलं की अद्वितीय नाटकांचा इतिहासच समोर उभा राहतो. त्यांच्या नुसत्या नावावरच हाऊसफुलचे बोर्ड लागायचे. मराठी रंगभूमीवरचे हे सुपरस्टार आता मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहेत.  ‘आणि...काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातून. आणि या भूमिकेचं शिवधनुष्य पेललंय सुबोध भावेनं.हिंदीसोबत मराठीतही बायोपिकचं वारं वाहतंय. आतापर्यंत मोठ्या पडद्यावर लोकमान्य टिळक, बालगंधर्व साकारलेला सुबोध भावे आता मोठ्या पडद्यावर काशिनाथ घाणेकर साकारणार आहे. 'आणि डॉ.काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा 7 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. याचं पोस्टर आज सुबोध भावेने सोशल मीडियावर प्रदर्शित केलं.यात सुबोधचा चेहरा एका आरशात दिसतोय.मेकअपच्या मदतीने काशिनाथ घाणेकरांची चेहरेपट्टी हुबेहूब साधण्याचा टीमचा प्रयत्न स्वागतार्ह आहे.

सिनेमात 1960चा काळ जिवंत केलाय. काशिनाथ घाणेकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यु, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी अशी अजरामर नाटकं गाजवली. हे सगळं आपल्याला सुबोध भावेच्या रूपात पाहता येईल.

वायकाॅम18चा हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज होतोय. आतापर्यंत मराठीत बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांच्यावरचे सिनेमे हिट झाले होते. सुबोध भावेनं टिळकांची भूमिका अप्रतिम केली होती. त्यामुळेच आणि काशिनाथ घाणेकर सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्यात.

याशिवाय सुबोधचा सविता दामोदर परांजपे सिनेमाही रिलीज होतोय. हे मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक. आणि आता हे नाटक सिनेमाच्या रूपात येतंय. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल यांच्या मुख्य भूमिका आहे. सिनेमाची निर्मिती केलीय जाॅन अब्राहमनं, तर स्वप्ना वाघमारे जोशीनं दिग्दर्शन केलंय. सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केलाय. या गाजलेल्या नाटकावरच्या सिनेमात काम करायला मिळतंय, याबद्दल सुबोध भावेनं स्वत:ला नशीबवान म्हटलंय. तर सविता दामोदर परांजपे ही अजरामर भूमिका रीमा लागूंनी केली होती. सिनेमात या भूमिकेचं आव्हान पेलताना छान वाटलं, असं तृप्ती सांगते. दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी म्हणतात, बरेच दिवस या नाटकावर सिनेमा करायचं डोक्यात होतं. जाॅन अब्राहमची साथ मिळाली, मग अजून काय हवं?

Birthday Special : नेहा धुपियानं सुरुवातीला अंगदला दिला होता नकार

First published: August 27, 2018, 2:51 PM IST

ताज्या बातम्या