सोनु, तुला आरजेवर भरोसा नाय का?

सोनु, तुला आरजेवर भरोसा नाय का?

मलिष्काचं समर्थन करणारा एक व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओत रेड एफएमच्या आरजेंनी मलिष्काचं एकत्र येऊन समर्थन केलंय.

  • Share this:

20जुलै: मलिष्काचं 'मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाही का' हे गाणं प्रचंड गाजलंय. त्या गाण्यावर शिवसेनेने प्रचंड टीकाही केली. आरजेला स्वत:वर भरोसा नाही का असा प्रश्नही विचारत तिची खिल्लीही उडवली. आता याच मलिष्काचं समर्थन करणारा एक व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओत रेड एफएमच्या आरजेंनी मलिष्काचं एकत्र येऊन समर्थन केलंय.

या गाण्याचा व्हिडिओ रेड एफ.एम.च्याच टीमने तयार केलाय. पण या व्हिडिओतले आरजे हे मुंबईचे नाहीत तर दिल्लीचे आहेत. या व्हिडिओत राजकारण्यांनाच प्रश्न विचारलाय. दिल्ली असो वा मुंबई सोनूची समस्या सेम आहे असं या व्हिडिओला नाव देण्यात आलंय.

'सोनू तुला आरजेवर भरोसा नाही का' असं म्हणत राजकारण्यांवरती टीका केली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाण्याच्या एका डबक्यात शूट झालाय. 'तुझको जोक समझता नही क्या?' असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. तसंच सोनू तू व्होट मागायला दरवर्षी येतोस आणि आश्वासन कधी पूर्ण करत नाहीस असे खडे बोल ही सुनावले आहेत.

आता या व्हिडिओतून सोनू म्हणत 'सेनेला' या टीमने चोख प्रत्युतर दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 07:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading