'डाव मांडते भीती... ' अमृता फडणवीस यांचं नवं गाणं; पाहा VIDEO

'डाव मांडते भीती... ' अमृता फडणवीस यांचं नवं गाणं; पाहा VIDEO

अमृता फडणवीस गाण्यासह अभिनयातही रस घेतात. त्यांच्या नव्या गाण्याच्या व्हीडिओतून याची झलक दिसेल.

  • Share this:

मुंबई, 7 जानेवारी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या हौशी गायिकासुद्धा आहेत. त्या सोशल मीडियावर याबाबत अपडेट देत असतात. त्यावरून त्यांना ट्रोलही केलं जातं. पण त्यांनी ही आवड अजूनही जपली आहे. त्यांचं एक नवं गाणं गुरुवारी प्रसिद्ध झालं. ते एका मराठी चित्रपटासाठी आहे आणि त्याचीही माहिती त्यांनी सोशल मीडियातून दिली आहे.

त्यांनी आजवर अनेक गाणी प्रसिद्ध केली आहेत. त्यातली काही सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी गाणी त्यांनी अल्बम्सच्या माध्यमातून गायली आहेत. आज त्यांचं अजून एक नवं गाणं प्रसिद्ध झालं आहे. अमृता फडणवीस यांनी आज प्रसिद्ध केलेलं हे गाणं 'अंधार' या मराठी सिनेमातील आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे (Sagrika Ghatge) आणि गुलशन देवैया या जोडीवर शूट झालेलं हे गाणं आणि सिनेमा आहे. यातील 'डाव मांडते भिती' (Andhaar) हे गाणं अमृता यांनी गायलं आहे.

अमृता फडणवीस यांनी अनेक लाईव्ह कार्यक्रमांमध्ये त्यांनी आजवर परफॉर्मन्स दिला आहे. 'पोलीस रजनी' सारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी आपली कला सादर केली आहे. या कार्यक्रमात त्या गुडविल अँबॅसिडर होत्या. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतही त्यांनी एका सिनेमात गाणं गायलं होतं. आता पुन्हा एकदा सिनेमात गाणं गात त्याचा व्हीडिओ (video) अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर (twitter) टाकला आहे.

काही काळापूर्वीच स्त्रीभ्रुणहत्याविरोधी जनजागृती करणारं 'तिला जगू द्या' हे गाणं अमृता यांनी गायलं होतं. या गाण्यावर जास्तच टीका करण्यात आली होती. युट्युबवर या गाण्याला लाइक्सहून डिसलाईक्सच अधिक मिळाल्या होत्या. मात्र याबाबत बोलताना अमृता म्हणाल्या होत्या, की कितीही ट्रोल (troll) केलं गेलं तरी मी त्यांचं स्वागतच करेन. गाणं मात्र सोडणार नाही. कारण मी पैशासाठी नाही तर माझ्यात टॅलेंट आहे म्हणून गाते.'

Published by: News18 Desk
First published: January 7, 2021, 10:10 PM IST

ताज्या बातम्या