'तेरी मेरी कहानी'नंतर हिमेशाच्या सिनेमासाठी रानूनं गायलं दुसरं गाणं, पाहा VIDEO

'तेरी मेरी कहानी'नंतर हिमेशाच्या सिनेमासाठी रानूनं गायलं दुसरं गाणं, पाहा VIDEO

आता रानू यांनी हिमेश रेशमिया सोबतच दुसरं गाणं रेकॉर्ड केलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : बंगाल येथील रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांना त्यांच्या सुमधूर आवाजामुळे बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली. रानूने बॉलिवूडचा संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या सिनेमातील गाणं गाण्याची संधी मिळाली. रानू यांनी हिमेशच्या आगामी हॅपी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं. नुकतीच या गाण्याची एक झलक समोर आली होती. त्यानंतर आता रानू यांनी हिमेश रेशमिया सोबतच दुसरं गाणं रेकॉर्ड केलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ब्लू कलरच्या साडीमध्ये दिसत असून त्यांच्यासोबत हिमेश रेशमिया त्यांना गाइड करताना दिसत आहे. रानू यांचं हे दुसरं गाणं आहे. त्यांच्या या गाण्याचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रानू यांना त्यांच्या पहिल्या गाण्यासाठी हिमेश रेशमियानं 5-7 लाख रुपये मानधन दिल्याचं बोललं जात आहे.हा व्हिडीओ हिमेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. 'तेरी मेरी कहानी'नंतर रानू आता 'हॅप्पी हार्डी और हीर' या सिनेमातील 'आदत' हे दुसरं गाणं रानू यांनी गायलं आहे.

दिशा पटानीनं सलग 4 फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट, शेअर केला 'हा' मेसेज

 

View this post on Instagram

 

After the epic blockbuster track teri meri kahani , Recorded another track Aadat from happy hardy and heer in the divine voice of Ranu mandol , here’s the glimpse of the song , the alaap and voice over is the theme of happy hardy and heer , thanks for all your love and support

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणं गाऊन स्वतःचं पोट भरत असे. अनेक लोकांनी तिचं गाणं ऐकलं काहीनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला पाहून तिच्याकडे दुर्लक्ष केलं. रानू नेहमी जुनी गाणी गात असे. तिचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला त्यात ती लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ हे गाणं गात होती. पण तिचं हे गाणं व्हायरल होण्यामागे हात होता तो एतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका तरुणाचा. जेव्हा रानू गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र त्या ठिकाणी होता. त्यानं सहज म्हणून तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. जो पुढे खूप व्हायरल झाला आणि फेमसही.

Saaho Review : 'बाहुबली' प्रभासच्या 'साहो' सिनेमानं केली निराशा?

एतींद्रने रानू यांचा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आणि रानूचं आयुष्य बदलत गेलं. त्यानंतर आता हिमेश रेशमियानं रानूला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली. रानूच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना एतींद्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यानं कधी कल्पनाही केली नसेल की त्याचा एक व्हिडीओ एका महिलेचं आयुष्य अशाप्रकारे बदवून टाकेल. रानूला ही संधी दिल्याबद्दल एतींद्रने हिमेशचे आभार मानले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एतींद्र सतत रानूच्या संपर्कात आहे. तो व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि रानाघाटमध्येच राहतो.

रानू मंडल यांना दोनदा करावं लागलं होतं लग्न, कारण...

========================================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या