21 नोव्हेंबर : सल्लूमिया आणि कतरिना कैफ यांचा आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है'ची चर्चा चांगलीच सुरू आहे. आता या सिनेमाचं नवीन गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत' हे नवीन गाण इंटरनेटवर शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच सलमान खानचा स्वॅग जलवा दाखवला आहे. त्याचबरोबर कतरिनाही अगदी तिच्या हटेके डान्स स्टाईलमध्ये तिचा हॉटनेस दाखवत आहे.
इर्शाद कामिल यांनी लिहलेल्या या गाण्याला विशाल ददलानी आणि नेहा भसीन यांनी गायलं आहे. विशाल आणि शेखर यांनी गाण्याला संगीत दिलं आहे.
या सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान आणि कतरिना जास्तीत जास्तवेळ अबू-धाबीमध्ये होते.कतरिनाने ग्रीसच्या कडाक्याच्या थंडीमध्येही शूटिंग केलं. त्यामुळे आता या गाण्यानंतर चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.अली अब्बास जाफर दिग्दर्शित सल्लूमियाचा हा सिनेमा 22 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Salman khan, कतरिना कैफ, सलमान खान