'मुबारका'चा टायटल ट्रॅक रिलीज

हे गाणं जर आता तुम्हाला गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत किंवा पार्टीसमध्ये एेकू आलं तर नवल वाटू देऊ नका .कारण हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. हे गाण तुम्हाला थिरकवेल .तुम्हाला पार्टीमूडमध्ये घेऊन जाईल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2017 12:38 PM IST

'मुबारका'चा टायटल ट्रॅक रिलीज

23 जून: अर्जुन कपुरच्या नव्या चित्रपटाचा टायटल ट्रॅक आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय . हे गाणं जर आता तुम्हाला गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत किंवा पार्टीसमध्ये एेकू आलं तर नवल वाटू देऊ नका .कारण हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. ते  तुम्हाला थिरकवेल .तुम्हाला पार्टीमुडमध्ये घेऊन जाईल.

या गाण्यात सिनेमातल्या आपल्या दोन्ही रूपांमध्ये अर्जुन कपुर दिसतोय. एकीकडे पगडी घातलेला सरदार अर्जुन आहे तर दुसरीकडे त्याच्या नेहमीच्या रूपातला अर्जुन आहे आणि अर्जुनासोबत सिनेमातला कर्तार सिंग अर्थात अनिल कपुर ही थिरकतोय. तसंच आथिया आणि एलिना डी क्रुझनंही ठेका धरलाय.

या गाण्याचा संगीतकार ऋषी रिच आहे तर बादशाह ,जग्गी डी. सुकृती कक्कर आणि य़श नार्वेकरनं हे गाण गायलंय.हा सिनेमा 23 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.हा सिनेमा एक फॅमिली कॉमेडी आहे. चरण आणि करण या दोन जुळ्या भावांच्या लव्ह स्टोरीसभोवती या सिनेमाची कथा फिरते. या सिनेमाचं दिग्दर्शन  अनिस बाझमीनं केलयं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 12:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...