पिता -पुत्रांच्या नात्याला उलगडणारं 'फिर वही'

जग्गा जासूसचं चौथं गाणं रिलीज झालंय. या आधी रिलीज झालेल्या तिन्ही गाण्यांहून हे गाणं एकदम वेगळं आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 11:34 AM IST

पिता -पुत्रांच्या नात्याला उलगडणारं 'फिर वही'

05जुलै: रणबीर कपूरच्या नव्या सिनेमाचं अर्थात जग्गा जासूसचं चौथं गाणं रिलीज झालंय. या आधी रिलीज झालेल्या तिन्ही गाण्यांहून हे गाणं एकदम वेगळं आहे.जग्गा जासूसमध्ये एकूण 29 गाणी आहेत.

या गाण्याला संगीत प्रीतमने दिलंय. फिर वही या नव्या गाण्यात रणबीर कपूरला आपल्या वडिलांची आठवण येतेय. हे गाणं गाता गाता वडिलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. तो प्रचंड नोस्टॅलजिकही झालाय. या चित्रपटात रणबीर कपूर आपल्या वडिलांनाच शोधतोय. याआधीची गाणी उडत्या चालीची होती तर हे गाणं कमी लयीचं आणि सायलेंट प्रकारातलं आहे. अर्थात अरिजीतने चढवलेला सुरांचा साज शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो आणि गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...