S M L

सनी लिओन-इम्रान हाश्मीचं 'बादशाहो'त हाॅट साँग

सनी लिओन या गाण्यात देसी लूकमध्ये दिसते आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Jul 25, 2017 07:56 PM IST

सनी लिओन-इम्रान हाश्मीचं 'बादशाहो'त हाॅट साँग

25 जुलै: बादशाहो सिनेमातलं 'पिया मोरे' हे नवीन गाणं रिलीज झालंय. या गाण्याच्या व्हिडिओत सनी लिओन आणि इम्रान हाश्मी धमाल करत आहेत. सनी लिओन इम्रानला या गाण्यात 'पिया मोरे' म्हणतेय.

सनी लिओन या गाण्यात देसी लूकमध्ये दिसते आहे. या गाण्यातला इम्रान हाश्मी पाहिल्यावर त्याचं या सिनेमातलं ट्रेलरमधलं ,'शर्म और में तो एक सेन्टेन्स में ही नही आते', हे वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही. हे बॉल्ड गाणं गायलं आहे मिका सिंग आणि निती मोहन यांनी. नव्वदच्या दशकाची आठवण करून देणाऱ्या या गाण्याला संगीत अमित तिवारीने दिलंय.विशेष म्हणजे हे गाणं लाल रंगाच्या बॅकग्राउंडवर शूट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close