News18 Lokmat

दीपवीरच्या लग्नात करण जोहरनं सिद्धार्थ जाधवला सांगितली 'ही' महत्त्वाची गोष्ट

सिंबामध्ये रणवीर सिंग आणि सारा अली खान तर आहेतच. पण महत्त्वाचं म्हणजे मराठी कलाकारांची फौजच आहे. आम्ही भेटलो सिद्धार्थ जाधवला. सिंबाच्या निमित्तानं सिद्धार्थनं न्यूज18लोकमतशी खास बातचीत केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2018 06:26 PM IST

दीपवीरच्या लग्नात करण जोहरनं सिद्धार्थ जाधवला सांगितली 'ही' महत्त्वाची गोष्ट

मुंबई, 20 डिसेंबर : वर्ष संपता संपता अॅक्शनप्रेमींना खास ट्रिट मिळणार आहे ती सिंबा सिनेमाची. सिंबामध्ये रणवीर सिंग आणि सारा अली खान तर आहेतच. पण महत्त्वाचं म्हणजे मराठी कलाकारांची फौजच आहे. आम्ही भेटलो सिद्धार्थ जाधवला. सिंबाच्या निमित्तानं सिद्धार्थनं न्यूज18लोकमतशी खास बातचीत केली.

'रोहित शेट्टी आणि माझा तसा नियमित काँटॅक्ट असतो. माझ्या येरे येरे पैसाच्या म्युझिक लाँचवेळी रोहित सर आले होते.' सिद्धार्थ सांगत होता. एक दिवस सिद्धूला प्राॅडक्शनकडून फोन आला. रोहित सरांनी बोलावलंय म्हणून. आणि मग सुरू झाला 'सिंबा'चा प्रवास.

'मला सिंबाची आॅफर आली, तेव्हा माझं गेला उडत नाटक सुरू होतं. सिंबाचा सेट पार्ल्याला लागणार होता. तेव्हा माझे नाटकाचे प्रयोग आणि सिनेमाच्या डेट्स अॅडजस्ट करायला रोहित सर तयार होते. पण नंतर हा सिनेमा हैदराबाद इथे शूट करायचं ठरलं.' सिद्धार्थ जाधव सांगत होता.

सिद्धार्थ जाधव संतोष तावडेची भूमिका साकारतोय. हा संतोष पोलीस आहे. सिंबाचा चेला आहे. सिद्धार्थला सेटवरचा अनुभव तर अविस्मरणीय ठरला.'मी रोहितसरांबरोबर गोलमाल सिनेमा केला होता. आता 13-14 वर्षांनी पुन्हा सिंबा केला. पण एक सांगतो रोहित शेट्टी माणूस म्हणून अजिबात बदलले नाहीत.' सिद्धू अभिमानानं सांगत होता.

शूटिंगच्या वेळी रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांच्या सूचना आणि शाॅट चांगला झाला तर कौतुक सिद्धार्थला मिळायचं. सेटवर तर त्याला खूप चांगले अनुभव आले. तो सांगतो, ' एकदा एका रात्री महत्त्वाचा सिन शूट होणार होता. अचानक पाऊस सुरू झाला. पण रोहित सर म्हणाले पाऊस थांबेपर्यंत आपणही वाट पाहू आणि मग काय, सेटवर एकच मैफल जमली. रणवीरनं स्पीकरवर गाणं सुरू केलं. सारा गायला लागली. एकच धमाल आली.'

Loading...


या सगळ्यामुळे सेटवर पाॅझिटिव्ह वातावरण होतं. सिद्धार्थनं रणवीरला विचारलं तू इतका एनर्जिटिक कसा? त्यावर तो म्हणाला, काम हेच माझं पॅशन आहे. सिद्धार्थ म्हणतो, ' नंतर नंतर आमच्या नाईट्स वाढल्या. एक दिवस मी स्वत: रणवीरला पाहिलंय, तो रात्री डान्स करत होता, सकाळी अॅक्शन, संध्याकाळी इमोशनल सिन आणि पुन्हा रात्री डान्स. कोणालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो.'

सिद्धार्थ सांगतो, ' रणवीरला मी अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलंय. तो जितका धमाल आहे, तितकाच गंभीरही आहे. त्याला मराठी सिनेमाविषयी माहिती आहे. कलाकारांबद्दलही माहिती आहे. '

सिद्धार्थ जाधव रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेला होता. त्यावेळी करण जोहर स्वत: सिद्धूला म्हणाला, सिंबामध्ये तू चांगलं काम केलंय. सिद्धार्थ म्हणतो, मला एक निर्माता असं म्हणतोय, अजून काय हवं?

सिद्धार्थच्या मते 2018 त्याच्यासाठी चांगलं होतं. येरे येरे पैसा वर्षाच्या सुरुवातीला हिट झाला. वर्ष संपताना माऊली सिनेमानं यश दिलं आणि आता सिंबाकडूनही अपेक्षा आहेत. पुढच्या वर्षीही सिद्धार्थचा प्रवास असाच धमाकेदार व्हावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...