कपिलच्या काॅमेडीला टक्कर 'काॅमेडी कंपनी'ची!

कपिलच्या काॅमेडीला टक्कर 'काॅमेडी कंपनी'ची!

कपिलचा सगळ्यात मोठा विरोधक कृष्णाला घेऊन हा शो सुरू होईल. हा शो एका घरातल्या चार सदस्यांभोवती फिरणार आहे.

  • Share this:

13 जून : कपिल आणि  सुनीलच्या भांडणानंतर  कपिलसाठी पुढची वाटचाल आता कठीणच दिसतेय. आधी सुनीलने शो सोडणं आणि आता दुसरा धक्का कपिलला दिलाय त्याच्या एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोस आणि आधीचा सहकारी अली अजगरने. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  हे दोघं कृष्णासोबत नवा कॉमेडी शो घेऊन येतायत. आणि तेही सोनी टीव्हीवरच. या नव्या शोचं  नाव असेल कॉमेडी कंपनी.

कपिलचा सगळ्यात मोठा विरोधक कृष्णाला घेऊन हा शो सुरू होईल. हा शो  एका घरातल्या  चार सदस्यांभोवती फिरणार आहे.

या शो मध्ये कृष्णाही कपिलच्या शोप्रमाणेच सेलिब्रिटी गेस्ट बोलवेल.  तसंच कपिलच्या एक्स गर्लफ्रेंड प्रीतीची बहीण नीती सिमोसही या शोमध्ये सहभागी होणारे.

कृष्णाने मात्र या शोबाबत जास्त काही बोलण्यास नकार दिलाय.

First Published: Jun 13, 2017 04:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading