मुंबई, 29 स्पटेंबर ; मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी 4 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) हा नवी मालिका घेऊन येत आहे . एकत्र कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका आहे. कानिटकर कुटुंबाची ही गोष्ट आहे . कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ आहे. या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर दिसणार आहे. तिच्यासोबत चेतन वडनेरेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar Biography) ही या मालिकेत अपूर्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरविषयी काही माहिती जाणून घेणार आहे.
ज्ञानदा आहे पुणेकर
ज्ञानदाने अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेसाठी ती खूप उत्सुक आहे. ज्ञानदा पुणेकर आहे कारण तिचा जन्म 26 जून 1995 ला पुण्यात झाला आहे. ज्ञानदाचे शिक्षण पी. ई. एस. मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, शिवाजी नगर, पुणे येथे झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण तिने पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, येथे पूर्ण केले आहे.
वाचा : 'तू एकटी नाहीस...' अरुंधतीने संजनाला दिला धीर; पाहा 'आई कुठे काय करते'मध्ये नेमकं काय
सख्या रे ही पहिली मालिका
थिएटर आर्टिस्ट म्हणून तिने काम करण्यास सुरूवात केली. 2016 मध्ये ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरूवात झाली. तिला सख्या रे ही पहिली मालिका मिळाली. यामध्ये तिने वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली होती. प्रेक्षकांना तिची ही भूमिका खूप आवडली व तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. यानंतर 2020मध्ये मराठी चित्रपट धुरळामध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव, अलका कुबल यासारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.
View this post on Instagram
मालिका सुरू होण्यासाठी फक्त सात दिवस उरले आहेत.
View this post on Instagram
शादी मुबारक या हिंदी मालिकेत केले आहे काम
यासोबतच ज्ञानदा शतदा प्रेम करावे, सख्या रे, जिंदगी नॉट आऊट या मालिकेत दिसली होती. २०२१ मध्ये तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने शादी मुबारक या मालिकेत काम केले आहे.
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रुपाली गुहा आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची असून गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. तेव्हा स्टार प्रवाहच्या या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी सज्ज व्हा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.