मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एका गोड घराची सुंदर कथा सांगणारं गोड गाणं; Thipkyanchi Rangoli चं शीर्षकगीत कसं तयार झालं पाहा VIDEO

एका गोड घराची सुंदर कथा सांगणारं गोड गाणं; Thipkyanchi Rangoli चं शीर्षकगीत कसं तयार झालं पाहा VIDEO

 स्टार प्रवाह (Star Pravah ) वाहिनीवर 4 ऑक्टोबरपासून ठिपक्यांची रांगोळी ( Thipkyanchi Rangoli ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या या मालिकेप्रमाणेच या मालिकेच्या शीर्षक गीताची ( Thipkyanchi Rangoli Title Song ) देखील चर्चा आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 07 ऑक्टोबर : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाह (Star Pravah ) वाहिनीवर 4 ऑक्टोबरपासून ठिपक्यांची रांगोळी ( Thipkyanchi Rangoli ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एकत्र कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही गोष्ट कानिटकर कुटुंबाचीआहे. सध्या या मालिकेप्रमाणेच या मालिकेच्या शीर्षक गीताची ( Thipkyanchi Rangoli Title Song ) देखील चर्चा आहे. हे गाणं कसे रेकॉर्ड केले आहे याचा व्हिडिओ समोर आले आहे.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या शीर्षक गीताची शब्दरचान रोहिणी निनावे यांची आहे. तर निलेश मोहरीर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला सई टेंभेकर यांनी सुरेल गायलं आहे. सध्या या शीर्षक गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या सुंदर गाण्यामागे किती मेहनत होती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. एका गोड घराची सुंदर कथा सांगणारं गोड गाणं प्रेक्षकांचे मन जिकंत आहे. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे, सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ आहे. हेच सगळं या गाण्याच्या माध्यमातून उलगडण्यात आलं आहे.

वाचा :वर्षभराने प्रचंड व्हायरल होतंय अवधूत गुप्तेचे 'जात' गाणं; प्रसिद्धीमागे कोल्हापूर कनेक्शन

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रुपाली गुहा आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची असून गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

ठिपक्यांची रांगोळी या नाविन्यपूर्ण शीर्षकाविषयी थोडी माहिती

ठिपक्यांची रांगोळी या नाविन्यपूर्ण शीर्षकाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, 'दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढत बसलेल्या माझ्या मुलीला पाहून मनात विचार आला की कसा एक ठिपका दुसऱ्या ठिपक्यापर्यंत रेष काढून जोडला जातो. बघताना हे सगळे ठिपके स्वतंत्र वेगळे एकमेकांपासून काही अंतरावर असले तरी जोडले गेल्यावर सुरेख नक्षी बनते. या मालिकेचं नाव ठिपक्यांची रांगोळी ठेवण्यामागचं हेच कारण.

वाचा : Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos

जोडून राहिलो तर छान सुरेख नक्षी मात्र एक रेष जरी हलली तरी चित्र विस्कटतं. नातेसंबंधांचं देखिल असंच असतं. नाती जोडून ठेवावी लागतात. हात पकडून ठेवावा लागतो, साथ द्यावी लागते, समजून घ्यावं लागतं. एकमेकांपर्यंत पोहोचावं लागतं. नाती कशी सुंदर असतात हे या मालिकेतून दाखवण्यात येत आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials