ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमलांची 'ही' अखेरची इच्छा जॉनने केली पूर्ण

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमलांची 'ही' अखेरची इच्छा जॉनने केली पूर्ण

सविता दामोदर परांजपे या सिनेमाद्वारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : सविता दामोदर परांजपे या सिनेमाद्वारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असतानाच तोरडमल हे आपल्या अखेरच्या घटका मोजत होते. मात्र आपल्या मुलीचा हा सिनेमा पाहण्याची त्यांना खूप इच्छा होती. तृप्ती यांनी त्यांची ही इच्छा सिनेमाचा निर्माता जॉन अब्राहमला सांगितली. त्यानंतर जॉनने पुढाकार घेऊन या सिनेमाच्या अनकट व्हर्जनचं खास स्क्रीनिंग तोरडमलांसाठी आयोजित केलं. हा सिनेमा पाहून तो उत्तम जमल्याचे आशीर्वाद तोरडमलांनी संपूर्ण टीमला दिले. जी या सिनेमाच्या टीमसाठी जमेची बाजू ठरलीय.

सविता दामोदर परांजपे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक. आणि आता हे नाटक सिनेमाच्या रूपात येतंय. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल यांच्या मुख्य भूमिका आहे. सिनेमाची निर्मिती केलीय जाॅन अब्राहमनं, तर स्वप्ना वाघमारे जोशीनं दिग्दर्शन केलंय. सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केलाय. या गाजलेल्या नाटकावरच्या सिनेमात काम करायला मिळतंय, याबद्दल सुबोध भावेनं स्वत:ला नशीबवान म्हटलंय. तर सविता दामोदर परांजपे ही अजरामर भूमिका रीमा लागूंनी केली होती. सिनेमात या भूमिकेचं आव्हान पेलताना छान वाटलं, असं तृप्ती सांगते. दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी म्हणतात, बरेच दिवस या नाटकावर सिनेमा करायचं डोक्यात होतं. जाॅन अब्राहमची साथ मिळाली, मग अजून काय हवं?

'गेल्या अनेक वर्षात मराठीत दर्जेदार सिनेमे येतात. मला या सिनेमाची निर्मिती करायला मिळाली, हे माझं भाग्यच आहे,' असं जाॅन सांगतो. हल्ली अनेक बाॅलिवूड कलाकारांनी मराठीकडे मोहरा वळवलाय. रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, अजय देवगण, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार असे अनेक जण मराठी सिनेमे करतायत. आणि त्यांना यशही मिळतंय

First published: July 29, 2018, 9:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading