Vin Diesel आणि जॉन सिनाच्या अ‍ॅक्शनसाठी तयार व्हा; Fast And Furious 9 चा काउंटडाऊन सुरू

Vin Diesel आणि जॉन सिनाच्या अ‍ॅक्शनसाठी तयार व्हा; Fast And Furious 9 चा काउंटडाऊन सुरू

Fast and furious: विन डीजलने (Vin Diesel) स्वतः आता फास्ट अँड फ्युरियस 9 (Fast and furious 9) च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च: हॉलिवूडची सुपरहिट फ्रेंचायझी फास्ट अँड फ्युरियसचे (Fast and Furious) आतापर्यंत 8 चित्रपट प्रदर्शित झाले असून या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे. आता प्रेक्षक या सिनेमाच्या 9 व्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली होती. त्यानुसार हा चित्रपट 28  मे ला (Fast & Furious 9 Release Date) प्रदर्शित होणार होता, पण आता चित्रपटाची रिलीज डेट पुढे सरकली आहे. या बातमीनंतर फास्ट अँड फ्युरियसचे चाहते नाराज झाले आहेत.

परंतु, आता विन डीजलने (Vin Diesel) फास्ट अँड फ्युरियसच्या सर्व चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. त्याने आगामी चित्रपटासाठी नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विन डीजलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलं आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टरनुसार आता फास्ट अँड फ्युरियस 9 (F9) 28 मे च्या ऐवजी आता 25 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. त्याच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

या आधी फास्ट अँड फ्युरियस 9 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आणि तो चाहत्यांना खूपच आवडला होता. ट्रेलर पाहून चित्रपट कधी प्रदर्शित होईल याकडेच लक्ष लागून आहे अश्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या होत्या.

हे वाचा -  दीपिका पदुकोण ते श्रद्धा कपूर; NCBच्या आरोपपत्रात या अभिनेत्रींची नावं आली समोर

आता पुन्हा एकदा नवीन टीझर शेअर करत विन डीजलने चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. मागच्या सर्व पार्टस प्रमाणेच हा येणारा पार्ट सुद्धा तितकाच दमदार असेल अशी आशा चाहते व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Published by: Aditya Thube
First published: March 5, 2021, 3:30 PM IST

ताज्या बातम्या