या महिलेच्या आवाजापुढे तर रानू मंडल सुद्धा फेल! पाहा VIRAL VIDEO

या महिलेच्या आवाजापुढे तर रानू मंडल सुद्धा फेल! पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील 'तिच्या' आवाजानं सर्वांनाच भूरळ पाडली आहे

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल यांचं आयुष्य एका रात्रीत पालटलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर बीक मागून स्वतःचं पोट भरणाऱ्या रानू यांना बॉलिवूड प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्याच्या सिनेमात गाणं गाण्याची संधी दिली आणि रानू मंडल स्टार झाल्या. पण त्यानंतर आता सोशल मीडियावर आणखी एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिचा आवाज ऐकल्यावर युजर्सना रानू मंडलची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुबोध घिलडीयाल नावाच्या एका युजरनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, या सुरेल आवाजाच्या महिलेला कोणी शोधू शकेल का? सुबोध यांच्या या ट्विटर पोस्टवर नेटकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.

थलायवा आता झाला Pride Icon Of India! महानायकाच्या सन्मानाचा सुपर VIDEO

या व्हिडीओमध्ये एक महिला ‘ताज महल’ सिनेमातील ‘जो वादा किया वो…’ हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याच्या मूळ गायिका लता मंगेशकर असून हे गाणं गीतकार अमित ढडवाल यांनी लिहिलं आहे. या महिलेचा आवाज इतका सुरेल आहे की तिला गाताना ऐकल्यावर सर्वांना पुन्हा एकदा रानू मंडलची आठवण झाली. अनेकांच्या मते ही महिला तर रानू मंडल यांच्यापेक्षा चांगलं गाते. त्यामुळे तिच्या या टॅलेटला वाव मिळायला हवं असा सूर सोशल मीडियावर दिसत आहे.

असा ही अवलिया; 16 वर्षात सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर, एकही फ्लॉप नाही!

दरम्यान या व्हिडीओमध्ये गाताना दिसणारी ही महिला कोण आहे? ती कुठे राहते? काय करते? या बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र तिच्या आवाजानं सर्वांनाच भूरळ पाडली आहे एवढं मात्र नक्की आहे. सध्या सोशल मीडियामुळे अशाप्रकारच्या अनेक लोकांचं टॅलेंट समोर येत मात्र त्यातून संधी मात्र फार कमी लोकांना मिळते. त्यामुळे रानू मंडल यांना जशी संधी मिळाली तशी या महिलेलाही मिळते का याची सर्वांना उत्सुकता आहे.

दिग्दर्शक सुजॉय घोषने Twitter वर लीक केली कहानी 3 ची स्टोरी

=====================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 21, 2019, 8:54 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading