S M L

VIDEO - अंगठी लपवताना कॅमेऱ्यात कैद झाली प्रियांका

सेलिब्रिटींचा एक ठरलेला फंडा असतो. ते स्वत:च्या तोंडानं काही बोलणार नाहीत. इतर बोलतात त्यांच्याबद्दल. तेव्हा ते गप्प बसून असतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2018 09:30 AM IST

VIDEO - अंगठी लपवताना कॅमेऱ्यात कैद झाली प्रियांका

मुंबई, 07 आॅगस्ट : सेलिब्रिटींचा एक ठरलेला फंडा असतो. ते स्वत:च्या तोंडानं काही बोलणार नाहीत. इतर बोलतात त्यांच्याबद्दल. तेव्हा ते गप्प बसून असतात. आता प्रियांका चोप्राचंच पहा ना. तिनं 'भारत' सोडला. आणि त्याची कारणं इतरांकडूनच कळायला लागली. ती स्वत: काही बोलत नाहीच मुळी.  ती एकदम अळीमिळी गुपचिळी. तुम्हाला काय समजायचं ते समजा.

पण दिल्ली विमानतळावर एक गोष्ट कोणाच्या नजरेतून सुटलं नाहीय. सिंगापूरमध्ये निकच्या कॉन्सर्टनंतर प्रियांका चोप्रा मायदेशी आली, त्यावेळी तिच्या डाव्या हातात एक अंगठी होती. पण, दिल्ली विमानतळातून बाहेर पडताना तिनं मीडियाची गर्दी पाहून मोठ्या शिताफीने अंगठी काढून जिन्सच्या खिशात ठेवली. पण कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार स्पष्टपणे दिसतो आहे. प्रियांकाला अनेकांनी गराडा घातला. कुणी तिचे आॅटोग्राफ्सही घेतले. पण त्यावेळी तिच्या बोटात काही अंगठी नव्हती.


#priyankachopra arrives to delhi today ❤️😻 Guys did you see her hiding her ring😂 - #بريانكا_تشوبرا وصلت الى دلهي لحضور مؤتمر اليوم❤️😻 - ي جماعه ركزوا لما فسخت الخاتم و حطته بمخباتها بسرعه😂😂 مادري لين متى بتخش!! - - #queenofbollywood#queenofhearts#queenpri#Bollywood#priyanka#بوليوود

Loading...

A post shared by Perfection is ?! PeeCee👑 (@priyanka.news) on

प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 09:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close